Well Water Level sakal
छत्रपती संभाजीनगर

Water Level : यंदा ऑक्टोबर महिन्यातच जिल्ह्याची भूजलपातळी गेली दोन मीटरने खाली

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यातच जमिनीच्या पोटातील पाणी खोल खोल गेले आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यातच जमिनीच्या पोटातील पाणी खोल खोल गेले आहे. गेल्या महिन्यात पावसाळा संपला. पाच वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यातील भूजलपातळी ७.८६ मीटर खाली गेली आहे. गेल्या पाच वर्षाच्या सरासरीचे तुलनेत ही घट सुमारे दोन मीटर आहे. सर्वात जास्त घट गंगापूर तालुक्यात झाली आहे.

या तालुक्यात ३.२५ मीटरने भूजल पातळी गेल्या पाच वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत खाली गेली. या तालुक्यातील पाच वर्षात सरासरी भूजल पातळी ६.५४ मीटर होती ती यंदा ९.७९ मीटर खाली गेली आहे.

पावसाळ्यानंतर भूजल पातळीची नोंद घेतली जाते, यासाठी जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या १४१ निरीक्षण विहिरीतील भूजलस्तराच्या नोंदी घेतल्या जातात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्थिर भूजलपातळी गेल्या पाच वर्षात सरासरी ५.१५ मीटर एवढी होती. यंदा या महिन्यात करण्यात आलेल्या तपासणीत ही सरासरी ७.११ मीटर खाली गेली आहे.

जिल्ह्यात गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत पाणीपातळी १.९६ मीटरने घटली आहे म्हणजे पाच वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत खाली गेली आहे. छत्रपती संभाजीनगर तालूक्यात गेल्या पाच वर्षात सरासरी स्थिर भूजल पातळी ४.८३ मीटर होती ती यंदा ७.८६ मीटर खाली गेली आहे. यामध्ये ३.०२ मीटर भूजलपातळी खाली गेली आहे.

यंदा ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या नोंदीनुसार फुलंब्री तालूक्यात ६.६५ मीटर खाली, पैठण ७.४४ , वैजापूर ८.५६ , खुलताबाद ७.७८, सिल्लोड ६.६२, कन्नड ७.१८ तर सोयगाव तालूक्यात २.१४ मीटरवर पाणी आहे. गेल्या पाच वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत यंदा फुलंब्री तालूक्यात भूजल २.४८ मीटरने खाली गेले आहे.

पैठण २.१०, गंगापूर ३.२५, सोयगाव तालूक्यात ०.१२, वैजापूर १.६६,, खुलताबाद १.१८, सिल्लोड २. ८ आणि कन्नड तालुक्यात गेल्या पाच वर्षाच्या भूजल पातळीच्या सरासरीच्या तुलनेत यंदा १.७८ मीटरने स्थिर भूजलपातळी खाली गेली असल्याचे सुत्राकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: महायुतीत जागावाटपावरून तणाव! ‘नो कॉम्प्रोमाइज’ मोडमध्ये शिंदेसेना; ७ जागांसाठी आक्रमक भूमिका घेत भाजपवर दबाव

SRH vs RCB Live: विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड! गतविजेत्यांनी मोठा डाव टाकला अन् किंग कोहली जगात 'सुपर डुपर' ठरला

NEET Paper Leak प्रकरणात मोठा खुलासा! भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार; कसा आखला डाव?

Hasan Mushrif Sharad Pawar : हसन मुश्रीफांनी संपलेला विषय पुन्हा काढला, "शरद पवारांना आमदार प्रेमापोटी भेटले असतील"; संजय शिरसाठांवरही केलं भाष्य

Mumbai Health Alert: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो? मुंबईतील वाढत्या केसेसमागचं विज्ञान आणि जीवनशैलीतील धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT