GANPATI  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chatrpati Sambhaji Nagar : छोट्या गणेशमूर्तींचे घरात करा विसर्जन

महापालिका प्रशासकांचे आवाहन; निर्माल्य घंटागाडीतच द्या

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - छोट्या गणेशमूर्तींचे घरातच विसर्जन करा आणि पूजेतून निघणारे निर्माल्य घंटागाडीत द्या, असे आवाहन महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी मंगळवारी (ता.१९) केले. महापालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेतर्फे महापालिका मुख्यालयात जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. प्रत्येक घंटागाडीसोबत एक हिरवी बॅग दिली जाणार आहे. नागरिकांनी निर्माल्य त्या बॅगमध्येच टाकावे, त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात येईल.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

पीओपीच्या मूर्तींचे साहित्य वेगळे करून महापालिकेच्या घंटागाडी सोबत द्या, त्याची देखील विल्हेवाट लावली जाईल. ड्रेनेजमध्ये किंवा इतरत्र पीओपीच्या मूर्तींचे साहित्य टाकू नका. गणेश मंडळांच्या मंडपासाठी आता पाच वर्षांसाठी परवानगी दिली जात आहे, मंडपासाठी शुल्कदेखील घेतले जाणार नाही, त्यांनी स्पष्ट केले.

गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या पथकांकडे मूर्ती दान करा असे सांगताना जी. श्रीकांत म्हणाले, दान केलेल्या मूर्तींचे महापालिकेतर्फे सन्मानाने विसर्जन केले जाईल. प्रत्येक झोन कार्यालयाच्या क्षेत्रात कृत्रिम तलाव तयार केले जाणार आहेत, याच तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन करा. स्वच्छ व सुंदर शहरासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे, त्याला साथ द्या असे आवाहन त्यांनी केले. नियमभंग करणाऱ्यांची परवानगी होणार रद्द

एखाद्या मंडळाने नियमाचा भंग केला तरच त्या मंडळाची परवानगी रद्द केली जाईल. नियम भंग न करणाऱ्या मंडळांना सलग पाच वर्षांसाठी परवानगी असेल. कोणत्याही गणेश मंडळाने आकडे टाकून विजेचे कनेक्शन घेऊ नये, चुकीचे काम करू नये. आपण श्रद्धेने श्रींचे पूजन करतो. श्रद्धेने पूजन करताना आपल्या हातून चुकीचे काम घडू देऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT