bhagwat karad sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : सरकारने सुरू केलेल्या योजनेचा लाभ घ्या; डॉ. भागवत कराड

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना आता शहरात कामानिमित्त कार्यालयीन सुविधा उपलब्ध झाली आहे.

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

छत्रपती संभाजीनगर - सरकारी योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा. आयुष्मान भारत कार्डसह काढत कामगारांनी नोंदणी करावीत, असे आवाहन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सेवा पंधरवडा अंतर्गत आयुष्मान भारत कार्ड, आभा कार्ड, कामगार नोंदणी या कार्यक्रम घेण्यात येत आहे. यासह कार्यक्रमात दिव्यांग विकास आघाडीच्या जिल्हा कार्यालयाचे विष्णूनरात हा उद््घाटन केंद्रीय अर्थमंत्री डॉ. कराड यांच्या हस्ते झाले.

यावेळी भाजपचे पश्‍चिम मतदार संघाचे निवडणूक प्रमुख राजू शिंदे, जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, दिलीप थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. भागवत कराड म्हणाले, दिवसेंदिवस आजारांची तीव्रता वाढत चालली आहे. गोरगरीब लोकांना चांगल्या दवाखान्यात सुविधा पैशाअभावी मिळत नाहीत.

त्यामुळे केंद्र सरकारने या योजना सुरू केल्या आहेत. गंभीर आजारांवरील उपचारासाठी शासन गरजूंना आर्थिक मदत करत आहे. आज भाजप दिव्यांग विकास आघाडी कार्यालयाचे उद््घाटन करताना आनंद होत आहे. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना आता शहरात कामानिमित्त कार्यालयीन सुविधा उपलब्ध झाली आहे. विविध योजनांची माहिती व पाठपुरावा केला जाईल. त्याकामी सर्व प्रकारची मदत केली जाईल, असे आश्‍वासनही डॉ. कराड यांनी केले.

यावेळी दिव्यांग आघाडीचे राज्य महामंत्री डॉ. भगवान चव्हाण, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जालिंदर शेंडगे, शहर सचिव नंदू गवळी, विस्तारक महेश माळवतकर, ओबीसी मोर्चाचे आनंद वाघ, वॉर्ड अध्यक्ष सुरेश हिवाळे, भीष्म आव्हाड, परळीकर काका, श्रीपाद सातारकर, गणेश संगेकर, तसेच दिव्यांग आघाडीचे कन्नड तालुकाध्यक्ष मिलिंद जाधव, सिल्लोड तालुक्याचे अध्यक्ष नंदकिशोर सनांसे, गंगापूर तालुक्याचे उपाध्यक्ष खेडकर, शहर अध्यक्ष अरुण तुपे पाटील, उपाध्यक्ष श्रीराम फुकटे, संतोष जाधव आदीसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

Parbhani Elections : आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हट्टामुळे भाजपाला बहुमत हुकलं, मेघना बोर्डीकर यांचे प्रयत्न अपूर्ण

Dilip Walse Patil : मला काही झाले नाही; मी भक्कम आहे, पण अजितदादांच्या जाण्यामुळे; माजी गृहमंत्री दिलीपवळसे पाटील यांच्या भावना अनावर

मोठी बातमी! पोलिस भरतीची लेखी परीक्षा ‘या’ महिन्यात; मैदानी चाचणी फेब्रुवारी-मार्चअखेर संपणार, लेखी परीक्षेसाठी १:१० उमेदवारांची निवड, वाचा...

SCROLL FOR NEXT