ludo game  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. sambhaji Nagar : ‘लुडो’वरुन वाद अन् कुटूंबीय भिडले! एका तरुणाच्या कुटुंबीयांनी केला चाकूने जीवघेणा हल्ला

ते एकमेकांना शिवीगाळ करीत असतानाच अभिषेकच्या आई-वडिलांनी वाद मिटविला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - लुडो गेम खेळण्यावरुन बालमित्रांचे वाद झाले, ही घटना दोन्ही कुटुंबातील सदस्यांना समजली अन् दोन्ही कुटुंबीय भिडले. त्यापैकी एका तरुणाच्या कुटुंबाने दुसऱ्या तरुणाच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने वार करत जीवघेणा हल्ला केला. तसेच, घरात तोडफोड केली. ही घटना सात ऑक्टोबररोजी जलाल कॉलनी परिसरात रात्री दहादरम्यान घडली. यात तीघे गंभीर जखमी झाल्याची माहिती बेगमपुरा पोलिसांनी दिली. अभिषेक शिंदे, आनंद शिंदे, सुनंदा शिंदे अशी जखमी मायलेकरांची नावे आहेत.

याप्रकरणी सुनंदा रावसाहेब शिंदे (४४, रा. जलाल कॉलनी) यांच्या फिर्यादीवरून शेख आतेफ, शेख आरेफ, शेख आवेश, शेख आसेफ, शेख रिजवाना आणि शेख अलमश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दाखल फिर्यादीनुसार, जखमी अभिषेक आणि आरोपी आतेफ हे दोघे लहानपणापासून मित्र आहेत. त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणेही असते. सात ऑक्टोबरच्या रात्री १० वाजता ते दोघे लुडो गेम खेळत होते. त्यात चाल चालविण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. ते एकमेकांना शिवीगाळ करीत असतानाच अभिषेकच्या आई-वडिलांनी वाद मिटविला. त्यानंतर मध्यरात्री साडेबारा वाजता आतेफचे वडील शेख आरेफ यांनी अभिषेक बाहेर ये, तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून बाहेर बोलावले.

तेव्हा सुनंदा यांनी दरवाजा उघडला असता दारात आरेफसह आतेफ, आवेश, रिजवाना, अलमश व तिचा पती आसेफ हे सर्वजण होते. त्याचवेळी आवेश व आतेफ धावत घरात घुसले आणि त्यांनी अभिषेकला बाहेर ओढत त्याच्या बरगडीजवळ चाकू खुपसला. त्याच्या हातावरही वार केला. आज अभिषेकला खतम करणार, असे तो बोलत असताना आनंद शिंदे त्याच्या मदतीला धावला. त्यानंतर सर्वांनी मिळून अभिषेक, आनंद, रावसाहेब आणि सुनंदा शिंदे या चौघांनाही मारहाण केली. रिजवाना हिने सुनंदा यांच्या डोक्यात दगड फेकून मारला. हे सर्वजण जखमी झाल्यावर आरोपींनी त्यांच्या घराच्या काचा फोडल्या. घरातील साहित्याची तोडफोड केली.

पोलिस आल्यावरच शिंदे कुटुंबीयांना मदत मिळाली. या प्रकरणी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास उपनिरीक्षक विनोद भालेराव करीत आहेत.

एकमेकांविरोधात गुन्हे दाखल

सुनंदा शिंदे यांच्या फिर्यादीवरून शेख कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच शेख आवेज शेख आरेफ (२४, रा. जलाल कॉलनी) याच्या तक्रारीवरून शिंदे कुटुंबीयांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात रावसाहेब शिंदे, अभिषेक शिंदे, आनंद शिंदे यांना आरोपी केले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक हिवराळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT