sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : पर्यटन राजधानीत ‘ग्रामीण’लाही ‘बूस्टर’! जिल्हा परिषदेतर्फे ३३ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर

सह्याद्री, अजिंठा, सातमाळा डोंगर रांगांमध्ये बहरलेय सौंदर्य

सुनील इंगळे

छत्रपती संभाजीनगर - ‘पर्यटन राजधानी’ म्हणून ‘छत्रपती संभाजीनगर’ची ओळख आहेच. अजिंठा आणि वेरूळच्या लेण्यांनी तर जगाला भुरळ घातलेली आहे. किल्ले, मंदिरे, ऐतिहासिक तलाव, धरणे यासह ग्रामीण पर्यटनाला चालना देणाऱ्या सह्याद्री, अजिंठा, सातमाळा डोंगर रांगांत भरभरून नैसर्गिक सौंदर्य पसरले आहे. मात्र, पर्यटनाच्या राजधानीतच ग्रामीण पर्यटनाची गोची झाल्याचे दिसून येते. म्हणूनच आता ग्रामीण पर्यटनालाही बूस्टर डोस देण्यात येणार आहे. येथे आलेला पर्यटक हा तीन ते चार दिवस येथेच थांबला पाहिजे यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील ग्रामीण पर्यटन चालना देण्यासाठी ३३ कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे.

पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याच्या वाट्याला फारसे काही येत नाही. स्थानिक वारसा असलेले ‘ग्रामीण पर्यटन’ जगाच्या नकाशावर आणण्याची गरज आहे. यासाठी जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील पर्यटनपूरक वातावरण असलेल्या अनेक ग्रामपंचायतींना एकत्र जोडून पर्यटनाची चेन निर्माण करण्यात येत आहे. यात वेरूळ, फुलंब्री येथे नैसर्गिक तलाव, धबधबे, मंदिर, जगप्रसिद्ध लेणी आहेत.

दौलताबाद येथील मोमबत्ता तलाव, म्हैसमाळ येथील बालाजी मंदिर तसेच सोयगाव, फर्दापूर, अजिंठा, सारोळा, कन्नड, फुलंब्री, सिल्लोडमधील पर्यटनपूरक वातावरण असलेल्या ग्रामपंचायतींना एकत्रित जोडण्यात येणार आहे. यासाठी काही

ग्रामीण पर्यटनस्थळांच्या पायाभूत सुविधा व परिसराच्या विकासासाठी ३३ कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे.

नवे कुठे, काय प्रस्तावित?

म्हैसमाळ, फर्दापूर येथे टेन्ट हाऊस

सोयगाव-फर्दापूर-अजिंठा येथे सायकल सर्किट

वेरूळ परिसरात पॅराग्लायडिंगचा प्रस्ताव

सोयगाव-कन्नड येथील शेतकऱ्यांच्या शेतात

सूर्यफूल, स्ट्रॉबेरीची लागवड करणार

शेतकरी व ग्रामपंचायतीलाही मिळणार उत्पन्न

कोणत्या कामाला किती खर्च अपेक्षित?

दौलताबाद (१० कोटी) ः दौलताबाद परिसरात यादवकालीन मोमबत्ता तलावाची संरक्षकभिंत, बोटिंग, कॅम्पिंग, तिकीट घर, सार्वजनिक स्वच्छतागृह, परिसरातील रस्त्याची कामे.

म्हैसमाळ (६ कोटी) : म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण असून या ठिकाणी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे.

वेरूळ (९ कोटी) ः पर्यटकांना सोयीसुविधा व परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास.

सूलिभंजन खुलताबाद (८ कोटी) ः वेरूळ लेण्यांच्या जवळ सूलिभंजन थंड हवेचे ठिकाण असून येथे प्रसिद्ध दत्त मंदिर हे तीर्थक्षेत्र आहे. येथे पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे.

एखादा पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी आला तर तो किमान तीन ते चार दिवस तिथे थांबला पाहिजे, तसेच त्यांनी जवळच्या पर्यटनस्थळांना भेटी द्याव्यात असा यामागील उद्देश आहे. यातून ग्रामपंचायतच्या आर्थिक उत्पन्नात वाढीसाठी मदत होणार आहे.

-विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT