Chh. Sambhaji Nagar Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar: एक कोटी चाळीस लाख रुपयांची इमारत धूळखात पडून; मुलींचे वसतिगृह मद्यपींच्या ताब्यात

एकीकडे इमारत बांधली असताना त्याकडे काणाडोळा केला जात आहे. तर दुसरीकडे लाखो रुपये इमारतीच्या भाड्यावर खर्च केला जात असल्याने येथील नागरिकांनी रोष व्यक्त केला

राजानंद सुरडकर, कन्नड

कन्नड - समाजकल्याण विभागाने मुलींच्या वसतिगृहासाठी २००३ मध्ये एक कोटी चाळीस लाख रुपये निधी खर्च करून इमारत बांधली. मात्र, हे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे पंधरा सोळा वर्षांपासून ही इमारत बेवारस अवस्थेत उभी आहे. यामुळे या इमारतीत मद्यपींनी ताबा मिळविली असून याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र काणाडोळा केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वर्ष २००३-४ ला हिवरखेडा रस्त्यावरील टेकडीवर समाजकल्याण विभागाने मुलींच्या वसतिगृहासाठी एक कोटी चाळीस लाख रुपये निधीतून इमारत उभी केली. मात्र, खर्च वाढल्याने या इमारतीचे प्लॅस्टर, दारे खिडक्या आदी किरकोळ कामे बाकी राहिली.

त्यानंतर पुढील कामाकडे समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून ही इमारत सध्या बेवारस अवस्थेत उभी आहे. विशेष म्हणजे दुसरीकडे खासगी इमारतीत मुलींचे वसतिगृह सुरू आहे.

यासाठी महिन्याला सरकारला लाखो रुपये भाडे भरावे लागत आहे. एकीकडे इमारत बांधली असताना त्याकडे काणाडोळा केला जात आहे. तर दुसरीकडे लाखो रुपये इमारतीच्या भाड्यावर खर्च केला जात असल्याने येथील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

दरम्यान, याबाबत विधानसभेत आमदार उदयसिंग राजपूत यांनी प्रश्न उपस्थित केला असता या प्रश्नाला उत्तर देताना प्रभारी समाजकल्याण मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करून सदरील इमारतीच्या उर्वरित बांधकामासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT