crime sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji nagar : हॉस्पिटलमध्ये सहकाऱ्यानेच केला महिलेचा विनयभंग

शहरातील सिनर्जी हॉस्पिटलमधील प्रकार,जाब विचारणाऱ्या पतीला बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्यासह मॅनेजरने एका सहकारी महिलेचा विनयभंग केला, इतकेच नव्हे तर पिडीता ही पतीसह जाब विचारण्यास गेली असता दोघा सहकाऱ्यांनी तिला अश्लील शिवीगाळ करत पतीला बेदम मारहाण केली. हा प्रकार दोनदा घडला. प्रथम महिलेने तक्रार न दिल्याने आरोपींची हिंमत वाढली आणि त्यांनी पुन्हा विनयभंग केला. सुभाष मुंडे आणि गोविंद जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी मुकूंदवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका २६ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली. फिर्यादीनुसार ती मुकुंदवाडी भागातील एन-२, सिडको येथील सिनर्जी हॉस्पीटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये ओ. टी. असिस्टंट म्हणून काम करते. तर तिथेच आरोपी सुभाष मुंडे हा देखील ओ. टी. असिस्टंट आहे, तर आरोपी गोविंद हा व्यवस्थापक म्हणून तिथेच काम करतो. दोघेही आरोपी पीडित महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करत असत.

२१ सप्टेंबररोजी दुपारी दोनदरम्यान पिडीता ही ऑपरेशन थिएटरमध्ये असताना आरोपी सुभाष मुंडे याने पाठीमागून येत मिठी मारत महिलेचा विनयभंग केला. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी पिडीता ही पतीसह जाब विचारण्यासाठी गेली असता, सुभाष मुंडे याने अश्लील शिवीगाळ करत पीडितेच्या पतीला बेदम मारहाण केली तर व्यवस्थापक आरोपी गोविंद जाधव यानेही अश्लील शिवीगाळकेली.तक्रार केल्यास, हॉस्पीटलचे नाव आले तर बघून घेतो अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक दिलीप बचाटे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: तमिळनाडूमध्ये सत्तेचा मोठा खेळ उलटला? विजयच्या पक्षाने सर्वांनाच दिला धक्का

Vijay Thalapathy TVK Party : विजय थलपथीचा तामिळनाडूच्या राजकारणात 'मास्टर' स्ट्रोक! पहिल्याच निवडणुकीत मोठी आघाडी

Pune Crime : पुण्यात सासऱ्याकडून सुनेची हत्या, ६ महिन्यांच्या बाळासमोरच भिंतीवर डोकं आपटलं अन्...

Tamil Nadu Election Result Update : लाडक्या बहिणींनी विजय थलपतीला तारलं, लग्नात मुलींना मिळणार आता ८ ग्रॅम सोने; थलपतीचा महाराष्ट्र पॅटर्न चर्चेत

Nagpur News: ट्रांझिट बेलनंतरही अटकपूर्व जामिनाचा हक्क नाही; उच्च न्यायालय : बहुचर्चित किडनी विक्री प्रकरणात डॉ. सिंगला दणका

SCROLL FOR NEXT