sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : महापालिकेत या, पण हेल्मेट घालूनच!

प्रशासक जी. श्रीकांत यांचे नागरिकांना फर्मान

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - महापालिकेत विविध कामांसाठी नागरिकांना दुचाकीवरून यायचे असेल तर त्यांना हेल्मेट वापरावेच लागेल, अन्यथा महापालिकेत येऊच नका, असे फर्मान महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी काढले आहे. विशेष म्हणजे, प्रशासकांनी हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतल्यापासून महापालिका मुख्यालय परिसरातील रस्त्यांवरच नागरिकांसह कर्मचारी दुचाकी पार्किंग करत आहेत. त्यामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होत आहे.

वाहतूक पोलिसांतर्फे शहरात हेल्मेटची सक्ती नाही. असे असताना जी. श्रीकांत यांनी २५ सप्टेंबरपासून महापालिकेत दुचाकीवर येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय जाहीर केला. दोन दिवसांत त्यांनी सामान्य नागरिकांना दुचाकीवरून येताना महापालिकेत येताना हेल्मटे वापरावे लागेल, अशी सुधारणा केली.

असे आदेश त्यांनी नागरिक मित्र पथकाला जर्मनी दौऱ्यावर असताना फोनवरून दिले. तेव्हापासून महापालिकेत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांकडे हेल्मेट नसेल त्यांना गेवटरच अडविण्यात येत आहे. अनेक नागरिक महापालिकेचे सुरक्षारक्षक, नागरिक मित्र पथकासोबत वाद घालत आहेत.

पोलिस हेल्मेट सक्ती करत नसताना महापालिकेत येणाऱ्यासाठी सक्ती कशासाठी असा प्रश्‍न करणाऱ्यांना आम्हाला साहेबांचे आदेश आहेत, असे उत्तर कर्मचारी देत आहेत. महापालिकेच्या पार्किंगमध्ये विनाहेल्मेट येणारे नागरिक, कर्मचाऱ्यांना गाड्या लावू दिल्या नसल्याने सर्वजण मुख्यालयाशेजारील रस्त्यावर दुचाकी पार्क करत आहेत.

त्यामुळे या रस्त्यावर वाहतूकीची कोंडी होत आहे. दरम्यान शुक्रवारी पत्रकारांसोबत बोलताना प्रशासक जी. श्रीकांत यांनी या निर्णयाचे समर्थन केले. दुचाकीवरून महापालिकेत यायचे असेल तर हेल्मेट वापरावेत लागेल, अन्यथा महापालिकेत येऊच नका, असे उद्गार काढले.

एका अधिकाऱ्याची शिक्षा नागरिकांना

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या एका अधिकाऱ्याचा दुचाकी वाळूवरून घसरल्याने अपघात झाला. त्यात अधिकाऱ्याचे दात पडले. ही माहिती त्यांनी प्रशासकांना दिली. त्यानंतर तातडीने जी. श्रीकांत यांनी संपूर्ण अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती करा, असे फर्मान काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT