sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : डोंगरनिवासिनी मनुदेवीच्या दर्शनासाठी गर्दी; सातव्या माळेला हजारो भाविकांनी घेतले देवीचे दर्शन

घाटनांद्रा-पाचोरा रस्त्यावर डोंगराच्या पायथ्याशी बोरमाळ तांड्याजवळ असलेल्या खोल‌दरीत मनुमाता देवीचे भव्य असे मंदिर असून

सकाळ वृत्तसेवा

घाटनांद्रा - घाटनांद्रा-पाचोरा रस्त्यावर डोंगराच्या पायथ्याशी, मराठवाडा व खानदेश भागाच्या सीमेवर निसर्गाच्या कुशीत वसलेली डोंगरनिवासिनी जगदंबा मनुदेवीमातेच्या सुरू असलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त शनिवार सातव्या माळेला भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी मनुदेवीमातेचा परिसर जय माता दीच्या जयजयकाराने दुमदुमून गेला होता.

घाटनांद्रा-पाचोरा रस्त्यावर डोंगराच्या पायथ्याशी बोरमाळ तांड्याजवळ असलेल्या खोल‌दरीत मनुमाता देवीचे भव्य असे मंदिर असून मंदिराच्या गाभाऱ्यात मनुमाता देवीची भव्य मुर्ती दृष्टीस पडते. देवीची मूर्ती बघितल्यावर मन प्रसन्न होऊन जाते, तर भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी अशी या देवीची महती सर्वदूर पसरलेली आहे.

मनुमाता देवीविषयी आख्यायिका निजाम राजवटीमध्ये येथून जवळच असलेल्या लोहगाव (ता.कन्नड) येथील एका गरीब घराण्यातील असलेली मनू नावाची मुलगी लग्नाला विरोध करत घाटनांद्रा डोंगराच्या दिशेने निघून गेली असता स्थानिक ग्रामस्थ तिचा शोध घेण्यासाठी तिच्या मागे आल्यावर तिने उंच टेकडीवरून उडी मारली. खोल दरीत डोंगराच्या पायथ्याशी देवीच्या रूपात ती प्रकट झाली. तीच ही मनुदेवी माता असल्याचे वृद्ध जाणकार सांगतात. त्यानंतर मनुदेवी म्हणून भाविक तिची पूजाअर्चा करू लागले.

देवीचे जुने व प्राचीन मंदिर होते. त्या मंदिरामध्ये देवीच्या मूर्तीचा तांदळा होता. साधारण पाच सहा वर्षांपूर्वी चाळीसगाव येथील देवीचे कुळबंधू सोनार परिवाराने या मंदिराचा जिर्णोद्धार केला. या ठिकाणी सुंदर असे भव्यदिव्य मंदिर उभारले. खानदेशात जाताना लागणाऱ्या डोंगराच्या पायथ्यापासून काही अंतरावर मनुदेवीचे मंदिर आहे. मनुदेवीचा परिसर हा निसर्गरम्य ठिकाण असून हा परिसर व्ही आकाराचा दिसतो. दुपारी बाराला येथे सूर्यदर्शन होते. तीन वाजेला सूर्य मावळताना दिसतो. असा हा विलोभनीय क्षण पाहण्यासारखा आहे. देवीचे मंदिर हे डोंगराच्या पायथ्याशी असल्याने मंदिराच्या चोहोबाजूंनी घनदाट जंगल असून हिंस्र पशुपक्षींचा याठिकाणी वावर आहे.

मंदिराजवळ तीनशे फुटांवरून कोसळणारा आकर्षक धबधबा देखील आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेतो. पाऊस पडल्यावर हा धबधबा खळखळून वाहू लागतो. यामुळे इथल्या निसर्गसौंदर्यात आणखीनच भर पडते. निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी निसर्गप्रेमी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्रोत्सवाची सांगता आष्टमीच्या होमहवनाने करण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT