digital  home
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : वर्षभरात घरे होणार डिजिटल! इंडसइंड बॅंकेतर्फे लागणार शहरात ॲड्रेस बोर्ड

महापालिकेच्या विविध सेवा, अत्यावश्‍यक सुविधा पुरविण्यासाठी देखील डिजिटल ॲड्रेसचा फायदा होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - शहरातील प्रत्येक घरावर क्यूआरकोड असलेला डिजिटल ॲड्रेस नंबर असलेला बोर्ड लावण्याचा निर्णय महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला आहे. हे काम इंडसइंड बॅंकेतर्फे केले जाणार असून, रेड मिलन कंपनी असे बोर्ड तयार करणार आहे. मंगळवारी महापालिकेने इंडसइंड बॅंकेला कार्यारंभ आदेश दिले असून, येत्या वर्षभरात हे काम केले जाणार आहे.

महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी शहरातील प्रत्येक घरावर डिजिटल ॲड्रेस नंबर असलेला बोर्ड लावण्याचा निर्णय घेतला होता. या बोर्डवर प्रत्येक घराचा क्यूआरकोड असेल. त्यानुसार घराची ओळख तयार होईल. एखाद्याला घराचा पत्ता द्यायचा द्यायचा असेल तर क्यूआर कोडवरून तो घरापर्यंत पोचू शकेल.

तसेच महापालिकेच्या विविध सेवा, अत्यावश्‍यक सुविधा पुरविण्यासाठी देखील डिजिटल ॲड्रेसचा फायदा होणार आहे. रायपूर शहरात अशा प्रकारचे बोर्ड लावण्यात आले आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी या शहरात जाऊन पाहणी केली होती. इंडसइंड बॅंकेने शहरात डिजिटल ॲड्रेस नंबर असलेला बोर्ड लावून देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार गेल्या काही दिवासांपासून महापालिका व इंडसइंड बॅंकेच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू होते.

मंगळवारी अखेर या बॅंकेला महापालिकेने कार्यारंभ आदेश दिले आहेत. रेडमेलोन ही कंपनी अशा प्रकारचे बोर्ड तयार करून देणार आहे. हे काम नऊ महिने ते एक वर्षापर्यंत चालणार असल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सांगण्यात आले.

महाराष्ट्रातील पहिले शहर ठरणार

यावेळी प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले, हा प्रकल्प केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया मिशन आणि राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी प्रकल्पाच्या अंतर्गत सेवा पोचवण्याची प्रक्रिया पुढे नेईल. छत्रपती संभाजीनगर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविणारे महाराष्ट्रातील पहिले शहर असेल. यावेळी स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, सौरभ जोशी, शहर अभियंता ए. बी. देशमुख, उपायुक्त अपर्णा थेटे, स्मार्ट सिटीचे फैज अली, इंडसइंड बँकेचे अंकित पारिख, रेडमेलोन कंपनीचे मोहित चेलारामानी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT