sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : गरिबांच्या मुलांनाही मिळणार संगणकाचे धडे जिल्ह्यातील ‘आयसीटी लॅबचे काम अखेर पूर्ण

संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांनी आयसीटी लॅबसाठी फर्निचर उभारले तर कंत्राटदाराकडून संगणकासह इतर साहित्यांची जोडणी करुन देण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे, याकरिता सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील शाळांमध्ये संगणक उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, जोडणीअभावी संगणक धूळखात पडून असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते.

याची दखल घेत संबंधित शाळा व कंत्राटदाराकडून तातडीने संगणक जोडणीचे काम पूर्ण करण्यात आले. जिल्ह्यातील जवळपास ७८ शाळांमध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून आयसीटी लॅब तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गरिबांची मुलेही आता आधुनिक शिक्षणात रमणार आहेत.

आयसीटी लॅबच्या फर्निचरसाठी जिल्हा परिषदेकडून संबंधित शाळांना निधी देखील वितरीत करण्यात आला होता. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे हा निधी परत गेला होता. त्यामुळे आयसीटी लॅब उभारण्यास शाळांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. तसेच जोडणीअभावी जिल्ह्यातील जवळपास ५० शाळांमधील जवळपास ५५० संगणक प्रत्येकी एक प्रिंटर, बॅटरी, इन्व्हटर, प्रोजेक्टर असे साहित्य धूळखात पडून होते.

याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांनी आयसीटी लॅबसाठी फर्निचर उभारले तर कंत्राटदाराकडून संगणकासह इतर साहित्यांची जोडणी करुन देण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या ‘इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन स्कूल’ (आयसीटी) योजनेंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल ७८ शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT