Arts Teacher Recruitment  sakal
छत्रपती संभाजीनगर

Arts Teacher Recruitment : शाळेत कला विषयाला 15 गुण; तरी शिक्षक भरतीबाबत शासन उदासीन

कलाशिक्षकांच्या भरतीबाबत शासन उदासीन परीक्षेसाठी गुण दिले; पण विषय शिकविणार कोण?

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : शैक्षणिक जीवनात कला विषयाला मोठ्या प्रमाणात महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळेच शासनाने दहावी परीक्षेत कला विषयासाठी तब्बल १५ गुणांची तरतूद केली आहे. परंतू, मागील अनेक वर्षांपासून कलाशिक्षकांची भरती बंद असल्याने शाळांमध्ये हा विषय शिकविण्यासाठी कलाशिक्षकच नाही.

त्यामुळे परीक्षेसाठी गुण दिले; पण कला विषय शिकविणार कोण? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत आहे.

मागील बारा वर्षांपासून शिक्षकभरती झालेली नाही. त्यामुळे अनेक शाळांतील कलाशिक्षकांच्या जागा रिक्तच आहेत. असे असले तरी दहावी परीक्षेत विद्यार्थ्यांसाठी १५ गुणांची शासनाने तरतूद केली आहे. इंटरमिजिएट ही शासकीय ग्रेड परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यांना या गुणांचा लाभ मिळू शकतो.

इतके भरभक्कम गुण मिळत असले, तरी या विषयाची तयारी करून घेण्यासाठी शाळांमध्ये कलाशिक्षक आहेत का? या प्रश्‍नाचे उत्तर मात्र नकारार्थी आहे. परिणामी, कलाशिक्षकांविना विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत आहे.

शाळांतील कलाशिक्षकांच्या जागा भरण्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. मोठ्या शाळांमध्ये तुलनेत परिस्थिती बरी आहे. कारण, या शाळांत एकापेक्षा अधिक कलाशिक्षक कार्यरत होते. एखादा शिक्षक निवृत्त झाल्यानंतर किमान अन्य शिक्षक तरी त्या ठिकाणी कार्यरत आहेत. मात्र, छोट्या शाळांची अवस्था अधिकच बिकट आहे.

या शाळांत एखादाच शिक्षक कार्यरत होता. तोही शिक्षक निवृत्त झाल्यानंतर या शाळा कलाशिक्षकाविनाच आहेत. इतर शिक्षकांकडे या विषयाची जबाबदारी सोपविली आहे. मात्र, संबंधित शिक्षकाला कला विषयाचे संपूर्ण ज्ञान नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण होत आहे.

शासकीय धोरणानुसार प्रत्येक शाळेत कला शिक्षकांची भरती केली पाहिजे. शिक्षक भरती नसल्याने राष्ट्रीय पातळीवरील कलावंत घडणार कसे? कला महाविद्यालयातून प्रशिक्षण घेवून अनेक विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत.

त्यांना रोजगार मिळणार कसा? कला शिक्षकांची भरतीसह इतर मागण्यांसदर्भात महाराष्‍ट्र राज्य कला शिक्षक महासंघातर्फे राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात मंगळवारी (ता.२५) बैठक घेवून आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल.

- प्रल्हाद शिंदे, सरचिटणीस,

कला शिक्षक महासंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT