sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : रोषणाई आठवड्यातच फिकी ; चार कोटींचा खर्च ,अनेक ठिकाणच्या लायटिंग पडताहेत बंद

शहरात विविध कार्यक्रमानिमित्त विद्युत रोषणाई केली जात आहे

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित्त राज्य शासनाने महापालिकेला ४० कोटी रुपयांचा निधी दिला. त्यातील चार कोटी रुपये खर्चून शहरातील उड्डाणपूल, दुभाजकांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती. उड्डाणपूल व चिकलठाणा विमानतळासमोरील रोषणाई कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, पण आठच दिवसांत या लायटिंग बंद पडत आहेत. त्या सुरू करण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.

शहरात विविध कार्यक्रमानिमित्त विद्युत रोषणाई केली जात आहे. याआधी जी-२० महिला परिषदेनिमित्त सुमारे सात कोटी रुपये खर्चून महापालिकेने विद्युत रोषणाई केली होती. त्यानंतर राज्य शासनाने मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त गेल्या महिन्यात ४० कोटींचा विशेष निधी दिला.

या निधीतील चार कोटी खर्चून पुन्हा शहरात विद्युत रोषणाई करण्यात आली. त्यात उड्डाणपूल आणि चिकलठाणा विमानतळासमोरील लायटिंगवर एक कोटीचा खर्च करण्यात आला. येथील लायटिंग कायम ठेवण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला. परंतु, आठ दिवसाच एक-एक करून लाइट बंद पडत आहेत.सेव्हनहिल, क्रांती चौकातील लायटिंग बंद पडली आहे. या लायटिंगच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदाराकडे आहे.

बंद पडणारी लायटिंग दुरुस्त करणे अथवा बदलण्याचे काम करणे गरजेचे आहे, पण कंत्राटदाराचे त्याकडे लक्ष नसल्याचे समोर आले आहे. बंद पडलेल्या लायटिंग सुरू करण्याची सूचना कंत्राटदाराला केली जाईल, असे कार्यकारी अभियंता राजू संधा यांनी सांगितले.

जी-२० मधील साहित्य भंगारात

जी-२० परिषदेनिमित्त उड्डाणपुलांवरील पथदिव्यांवर, उड्डाणपुलाखाली विद्युत रोषणाई करण्यात आली. ठिकठिकाणी कारंजे लावण्यात आले. वाहतूक बेट, आर्टिफिशियल झाडे लावून व त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली. तसेच ऐतिहासिक दरवाजे, व्हर्टिकल गार्डनवर देखील लायटिंग करण्यात आली होती. सुमारे चार कोटींची विद्युत रोषणाई कायमस्वरूपी ठेवण्यात येईल, असे त्यावेळच्या निविदेत नमुद होते, पण काही ऐतिहासिक दरवाजे व आर्टिफिशियल झाडांची लायटिंगची वगळता इतर ठिकाणची विद्युत रोषणाई दोन महिन्यांतच भंगारात निघाली. तीच गत आता मुक्तिसंग्रामदिनानिमित्त करण्यात आलेल्या लायटिंगची होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

SCROLL FOR NEXT