cctv sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : ‘ उपरवाला ’सब देख रहा है! जिल्ह्यातील ११३ गावांत दोन हजार ७८ सीसीटीव्ही

ग्रामस्थांचा उपक्रम, आले १८ गंभीर गुन्हे उघडकीस

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - तंत्रज्ञानामुळे गुन्ह्यांची उकल करणे सोपे झाले. त्यामुळेच ग्रामीण पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी ‘एक गाव एक सीसीटीव्ही’ या उपक्रमाअंतर्गत ग्रामस्थांना सीसीटीव्ही बसविण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत आतापर्यंत जिल्ह्यातील २३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ११३ गावांत ग्रामस्थांनी स्वखर्चातून ७३४ सार्वाजनिक ठिकाणी तब्बल दोन हजार ७८ सीसीटीव्ही बसविले.

त्यामुळे शहराप्रमाणेच या गावांमध्येही आता ‘उपर वाला सब देख रहा है!’ असे चित्र आहे. या उपक्रमाचे उद्‍घाटन विशेष पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २०) टीव्ही सेंटर येथील अधीक्षक कार्यालय ऑनलाइन झाले.

काही दिवसांपूर्वी पैठण तालुक्यात एका वस्तीवर दरोडेखोरांनी दरोडा टाकून महिलेवर अत्याचार केला होता. असे प्रकार टळावे, गुन्हा घडला तर आरोपींचा माग काढणे सोपे व्हावे, यासाठी पोलिस अधीक्षक कलवानिया यांनी या प्रकरणानंतर ‘एक गाव एक सीसीटीव्ही’ या उपक्रमाअंतर्गत ग्रामस्थांना सीसीटीव्ही बसविण्याचे आवाहन केले होते.

त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत जिल्‍ह्यातील ११३ गावांतील ग्रामस्थांनी सीसीटीव्ही बसवले. त्याचा परिणाम लगेच दिसून आला. या सीसीटीव्हीमुळे दरोडा, चोऱ्या यासारखे १८ गंभीर गुन्ह्यांची तत्काळ उकल होण्यास मदत झाली. सीसीसीटीव्हीच्या उद्‍घाटन कार्यक्रमात सीसीटीव्ही बसविणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. अपर अधीक्षक सुनील कृष्णा लांजेवार यांनी प्रस्ताविक केले.

आपण सण, उत्सव साजरा करताना वर्गणी जमा करतो. यातील काही रक्कम काढून तसेच वाढदिवस साजरा करण्यावरील खर्च टाळून त्या पैशांतून सीसीटीव्ही बसवा. पोलिस दल आपल्या सुरक्षेसाठी आहेच. पण, त्यांना तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर गुन्ह्याला आळा बसेल.

- मनीष कलवानिया

पोलिस अधीक्षक, ग्रामीण पोलिस दल.

प्रमुख चौक, रस्ते, बाजारपेठ, सराफा मार्केट, बँक व एटीएम परिसर, गर्दीची ठिकाणे सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने ग्रामस्थांनी सीसीटीव्ही बसवले आहेत. अनेक दुकानदारांनी त्यांच्या दुकान परिसरात सीसीटीव्ही बसविले आहेत. त्यांनी स्थानिक पोलिस ठाण्याची मदत घेऊन त्यांचा अँगल हा रस्ता परिसरातील हालचाल टिपली जाईल असा ठेवावा, असे आवाहन पोलिसांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT