sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : लग्नाचा ‘ऑनलाईन’ वादा, बसला १६ लाखांचा गंडा!

विधवा असल्याचा अन् बॅंकेतील नोकरीचा घेतला फायदा

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - लग्न जुळविणाऱ्या वेबसाईटवर विधवा महिलेला खोटे नाव सांगत तिच्याशी ओळख वाढविली. तिच्या सहावर्षीय मुलीसह सांभाळ करण्याचे आश्वासन देत तिच्याकडून बांधकाम व्यवसायाचे खोटे दस्तावेज, बनावट आधारकार्ड दाखवत तिच्याकडून तब्बल १६ लाख उकळले अन् एक दिवस बोलणे टाळत गायब झाला. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच महिलेने पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. आर्यन मुकुंदराव देशपांडे ऊर्फ पंकज मुकुंदराव महाजन असे आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी ३३ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती मुंबईतील एका राष्ट्रीयकृत बॅंकेत काम करते, सध्या हनुमाननगरात राहते. तिला एक सहा वर्षाची मुलगी आहे, बॅंकेत काम करणाऱ्या तिच्या पतीचे वर्षभरापूर्वी निधन झाले. दरम्यान फिर्यादीच्या भावाने तिला ‘जीवनसाथी’ या संकेतस्थळावर लग्नासाठी खाते उघडून दिले होते.

अशी केली फसवणूक

आरोपीने फिर्यादी तरुणीसह तिच्या बहिणीलाही भेटत विश्वास संपादन केला. दरम्यान शहरात आल्यानंतर त्याने मित्रासोबत पार्टनरशिपमध्ये गुंतवणूक केली असून त्यासाठी फक्त १० लाख रुपये लागत असल्याचे सांगत महालक्ष्मी हाईटस् या नावाचे त्याच्याकडे असलेले बांधकाम व्यवसायाची कागदपत्रे दाखवत तरुणीचा विश्वास संपादन करत पैशांची मागणी केली. त्याचवेळी तरुणीनेही तिच्या बॅंकेतून पाच लाख रुपये रोख काढून घरमालकासमक्ष २५ फेब्रुवारीरोजी आरोपीला दिले.

त्याने आर्यन देशपांडे असल्याचे तरुणीला सांगितले होते. दरम्यान आर्यन हा तरुणीला बांद्रा मुंबईत भेटला आणि त्याने घरचे लग्नाला नकार देत असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे, तर ८ जून रोजी त्याने व्हाटअपवर ‘तू माझी कोठेही तक्रार करु शकते’ असे मेसेज पाठवून मोबाईल बंद करुन ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार म्हस्के करत आहेत.

अशी झाली ओळख

आरोपी आर्यन ऊर्फ पंकज महाजन याने संबंधित संकेतस्थळावर स्वतःची नोंदणी केलेली होती, त्याने तरुणीला रिक्वेष्ट पाठवून तिच्याशी ओळख वाढविली. तुझ्या मुलीसह तुझा सांभाळ करेन असे म्हणत त्याने तिचा विश्वास संपादन केला.

इतकेच नव्हे तर फेब्रुवारी २०२३ मध्ये तो तरुणीला भेटण्याठी शहरात आला, त्यावर तीने ‘तुझ्या घरच्यांना याबाबत सांगितले का? अशी विचारणा करताच त्याने माझा व्यवसाय सुरु करावयाचा असून तो सुरु झाला की, सांगेन असे म्हणत बोलणे टाळले. तसेच स्वतःचा मोबाईल हरविल्याचे झाल्याचे सांगत तरुणीकडून तब्बल ३३ हजारांचा मोबाईलही घेतला. त्यानंतर तरुणीच्या मुंबईतील बहिणीला भेटला, तसेच आईवडिलांनाही भेटण्याची तयारी दाखविली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway : पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी! नांदेड आणि हरंगुळ एक्स्प्रेस गाड्या २६ जानेवारीपासून हडपसरवरून सुटणार, पहा नवीन वेळापत्रक

IPL 2026: राजस्थान रॉयल्सला मिळाली द्रविडची रिप्लेसमेंट! जडेजाला संघात घेतल्यानंतर जाहीर केला मोठा निर्णय

Latest Marathi Breaking News : बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित

Mumbai Crime: अंधेरीत विद्यार्थ्याला श्वानासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं, ब्लॅकमेल करत बळजबरीनं लिंगबदल करायला लावलं; तृतीयपंथीयांकडून अत्याचार

Pune Cyber Fraud : पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; पार्टटाइम जॉब आणि शेअर ट्रेडिंगच्या नावाने ९८ लाखांची फसवणूक

SCROLL FOR NEXT