online games  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : ऑनलाइन ‘गेम’मुळे आयुष्याचा खेळ! शहरातील किशोरवयीन मुलांना मोहाचा फास

ऑनलाइन ल्युडो, सापशिडी जुगारच ल्युडो, सापशिडी सारखे गेम स्मार्टफोनमध्ये ॲपवर स्वरूपात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

विजय देऊळगावकर

छत्रपती संभाजीनगर - लहानपणी उन्हाळ्याची सुटी असो की दिवाळीची सुटी. घरबसल्या ल्युडो किंवा सापशिडी हे बैठे खेळ प्रत्येकाने मनोरंजनासाठी खेळलेले असतील. रम्मी, तिर्रट, क्रिकेट सट्टा हे खेळ तर जुगाराचे प्रकार म्हणून प्रसिद्ध आहेतच. परंतु, आता इंटरनेटच्या युगात ल्युडो, सापशिडी सारख्या मनोरंजनाच्या खेळांनादेखील ऑनलाइन जुगाराचे माध्यम म्हणून खेळवण्यात येत आहे. झटपट पैशांच्या मोहापायी विद्यार्थी, तरुण याच्या विळख्यात अडकत आहेत. यामध्ये ऑनलाइन रक्कम गुंतवण्यासाठी काहीजण गुन्हेगारी किंवा कर्जबाजाराकडे वळत असून, आयुष्याचाच ‘खेळ’ होत आहे.

ल्युडोचे पारंपरिक नावं चंफुल आहे. नंतर आधुनिक काळात हा खेळ कार्डबोर्डवर आला. त्यानंतर त्याचे नाव ल्युडो झाले. सोंगट्यांची जागा चार विविध रंगाच्या खाण्यांनी घेतली तसेच आकड्यांच्या फाशाचा वापर आकडे टाळण्यासाठी होऊ लागला. सापशिडी हा खेळ तर लहानथोरापासून सर्वांना माहीत आहे. दोन्ही खेळात एका वेळी दोन ते चार खेळाडू खेळू शकतात.

ऑनलाइन ल्युडो, सापशिडी जुगारच ल्युडो, सापशिडी सारखे गेम स्मार्टफोनमध्ये ॲपवर स्वरूपात आहेत. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर एक आयडी कोड तयार होतो. समोरील युझर्सला जाळ्यात फसवण्यासाठी ॲप ओनर बोनस स्वरूपात काही पॉईंट म्हणजे अल्प अशी १० ते २० रुपयापर्यंत रक्कम आपल्या खात्यात टाकते. यानंतर विविध स्पर्धांचे पर्याय समोर येतात. यामध्ये समोर खेळणारे युझर्सही ऑनलाइन दाखवण्यात येतात. नवीन युझर्स ही बोनस स्वरूपातील लगेच हरल्यानंतर ही मंडळी ‘ॲड कॅश’चे ऑप्शन देत अधिक किंवा दुप्पट, तिप्पट रकमेचे आमिष दाखवतात.

प्रातिनिधिक उदाहरणे कुटुंबाने केले साडेतीन लाख चुकते

बीड बायपास भागातील बीएस्सी प्रथम वर्गात शिकणाऱ्याला एका तरुणाला दोन वर्षांपूर्वी मित्रांच्या संगतीत ल्युडो खेळाचा नाद लागला. सुरुवातीला मनोरंजन म्हणून खेळताना याचे व्यसन लागले. अधिक मोहाच्या रक्कमेपायी अनेकांकडून व्याजाने पैसे घेऊन सगळी रक्कम ऑनलाइन गेममध्ये गमावली. देणेदारांनी तगादा लावल्यानंतर कुटुंबाने जवळपास साडेतीन लाख चुकते केले आणि मुलाची सरळ होस्टेलमध्ये रवानगी केली.

तणावामुळे आला प्रकार लक्षात

अंबड येथील एका खासगी कार्यालयातील एक कर्मचाऱ्याला ल्युडोचा नाद लागला. कर्मचाऱ्याचे वेतनाचे तर पैसे या खेळात गेलेच वर त्याने घरून उचलेगिरी करून रक्कमही गमावली. तो नेहमी तणावात राहत असल्याने कुटुंबाच्या लक्षात हा प्रकार आला. मानसोपचार तज्ज्ञाकडे नेत त्याचे समुपदेशन करण्यात आले.

ऑनलाइन गॅम्बलिंग हा मुळात अनधिकृत प्रकार आहे. स्किल गेमचे इनपुट दाखवत हा प्रकार सुरू आहे. अधिकृत लॉटरीतून जसा शासनाला महसूल भेटतो तसा महसूल ऑनलाइन गॅम्बलिंग चालवणाऱ्या कंपनी देतात का हा प्रश्न आहे? हा प्रकार जर नियमित नसेल तर नियमित करायला हरकत नाही.

संजयकुमार, माजी पोलिस महासंचालक

मुलगा जर घरात वारंवार खोटे बोलत असेल; शिक्षण, व्यवसायापासून पळ काढत असेल तर पालकांनी त्याचे कारण शोधले पाहिजे. मुलाला विश्वासात घेऊन समजून घेतले पाहिजे. त्याला दिलेल्या किंवा तो कमावत असलेल्या पैशांचा वापर कुठे करतो हे पण पहिले पाहिजे. गरज पडल्यास मानसोपचार तज्ज्ञाकडून समुपदेशन गरजेचे आहे.

डॉ. संदीप शिसोदे, मानसोपचार समुपदेशक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT