dog  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : पाळीव प्राण्यांना लागणार परवानगी; अन्यथा महापालिका करणार दंडात्मक कारवाई

शहरात अनेक वर्षांपासून मोकाट श्वानांना विषय गाजत आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - महापालिकेने पाळीव कुत्रा, मांजर या प्राण्यांसाठी परवाना बंधनकारक केला आहे. सोबतच आता गाय, बैल, म्हैस, शेळी या पाळीव प्राण्यांसाठीही परवानगी घ्यावी लागणार आहे. पाळीव प्राण्यांचे दोन फोटो, आणि शुल्क भरून गाय, बैल, शेळी, म्हैस, घोडा अशा प्राण्यांसाठी परवाना घ्यावा, अन्यथा कारवाई केली जाईल, अशा इशारा प्रशासनाने दिला आहे.

शहरात अनेक वर्षांपासून मोकाट श्वानांना विषय गाजत आहे. श्‍वानांच्या निर्बिजीकरणावर कोट्यवधी रुपये खर्चही त्यांची संख्या नियंत्रणात आलेली नाही. आजही शहरातील चौकाचौकांत व रस्त्यावर मोकाट श्‍वान आढळून येत आहेत. हे मोकाट श्‍वान नागरिकांवर हल्ले करतात. त्यासोबतच आता मोकाट जनावरांचा विषय गंभीर बनला आहे. महापालिकेने काही वर्षांपूर्वी शहरातील सर्व गोठे बाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. जनावरे रस्त्यावर मोकळे सोडली जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे महापालिकेने गाय, बैल, म्हैस, शेळी, घोडा, उंट या पाळीव प्राण्यांसाठी परवाना घेणे बंधनकारक केले आहे.

असा मिळवा परवाना

ऑफलाइन परवाना पशुचिकित्सालय बायजीपुरा येथून मिळणार आहे. परवाना घेण्यासाठी अर्ज, अर्जासोबत पाळीव प्राण्यांचे दोन फोटो, जनावरे ठेवण्यासाठी उपलब्ध जागेची माहिती, पाळीव जनावरे पाळण्यासाठी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचे ना-हरकत प्रमाणपत्र, कुत्रा व मांजरीस रेबीज लसीकरण प्रमाणपत्र, मांजरीचे निर्बिजीकरण शस्त्रक्रिया केल्याचे पशुवैद्यकाचे प्रमाणपत्र, परवाना शुल्क भरणे आदींची पूर्तता करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT