sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : धोरण कागदावर, कोंडी रस्त्यावर! दोन वर्षांपासून पार्किंग, १० वर्षांपासून ‘फेरीवाला’ धोरणावर चर्चाच

शहरातील मुख्य चौक, बाजारपेठा, मुख्य रस्त्यांवर दररोज वाहतुकीची कोंडी निर्माण होते.

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

छत्रपती संभाजीनगर - शहरातील प्रमुख चौक, वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने पार्किंग धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. त्यासोबत २०१२-१३ पासून फेरीवाला धोरण तयार केले जात आहे, पण पार्किंग व फेरीवाला धोरण अद्याप कागदावरच असून नागरिकांना दररोज वाहतुकीच्या कोंडीतून वाट काढताना कसरत करावी लागत आहे.

शहरातील मुख्य चौक, बाजारपेठा, मुख्य रस्त्यांवर दररोज वाहतुकीची कोंडी निर्माण होते. सणासुदीच्या दिवसात तर बाजारपेठेत पायी चालणे देखील अवघड आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. वाहतुकीच्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी महापालिकेने पार्किंग धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला.

त्याची अंमलबजावणी सुरवातीच्या काळात सात रस्‍त्यांवर करण्याचे ठरले, मात्र हे धोरण अद्याप कागदावरच आहे. अनेक रस्त्यांवर पांढरे पट्टेसुद्धा मारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहतूक पोलिसांना बेकायदा पार्किंगच्या ठिकाणी कारवाई करणे देखील अवघड झाले आहे. सध्या नवरात्रानिमित्त बाजारपेठेत गर्दी आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.

या वाहतुकीच्या कोंडीतून सुटका कधी होणार असा प्रश्‍न नागरिक करत आहेत. पार्किंग धोरणाप्रमाणेच फेरीवाला धोरण रखडले आहे. महापालिकेने फेरीवाला धोरण तयार करण्यासाठी त्यांची नोंदणी करून घेतली होती. त्यात १४००० फेरीवाल्यांची नोंद झाली. त्यांना ओळखपत्र देऊन हातगाड्या लावण्यासाठी ठरावीक जागा निश्‍चित करून दिल्या जातील, असे सांगण्यात आले, पण अद्याप फेरीवाला धोरण ठरलेले नाही. त्यामुळे हातगाड्या सर्रास रस्त्यावर लावल्या जात आहेत.

रस्ते नवे; पण अतिक्रमणांचा विळखा

महापालिकेने गेल्या काही वर्षात कोट्यवधी रुपये खर्च करून नवे रस्ते तयार केले आहेत. पण या नव्या रस्त्यावर वाहतुकीची जुनी कोंडी कायम आहे. राज्य शासनाने सुमारे ३०० कोटी, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ३१७ कोटी तसेच महापालिकेच्या निधीतून सुमारे १०० कोटीचे रस्ते करण्यात आले आहेत. याशिवाय आमदार आणि खासदारांच्या निधीतून रस्त्याची कामे सुरुच आहे, मात्र अनेक रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी पाहता हा निधी वाया गेला की काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Travel Guide : अनवट संस्कृतीचे दर्शन! आसाम आणि मेघालयचा प्रवास म्हणजे निसर्ग आणि संस्कृतीचा अनुभव

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT