sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji nagar : ‘माउंट मनास्लू’वर रफिक शेख यांची यशस्वी चढाई

पोलिस दलाला पुन्हा मानाचा तुरा जगातील ८ व्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस दलातील पोलिस शिपाई रफीक शेख यांनी मंगळवारी (ता. २६) पुन्हा इतिहास घडवला. त्यांनी जगातील ८ व्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर ‘माउंट मनास्लू’वर यशस्वी चढाई केली. रफिक शेख यांनी २०१६ मध्ये जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टदेखील सर केलेले आहे. अशी उत्तुंग दुहेरी कामगिरी करणारे रफिक शेख हे पोलिस दलतील पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. रफिक शेख यांना उजव्या पायाचा अंगठा व दोन बोटे २०१६ च्या एव्हरेस्ट मोहिमेअंतर्गत गमवावी लागलेली आहेत. तरीही इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवले.

पोलिस अधीक्षकांनी दाखवला झेंडा

१ सप्टेंबरला त्यांच्या या मोहिमेला पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरवात झाली. ३ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांची ही मोहीम प्रत्यक्ष सुरू झाली.

देश-विदेशातील गिर्यारोहक

शेख रफिक यांच्या टीममध्ये अमेरिका, पोलंड, स्पेन, फ्रान्स व कॅनडा येथील गिर्यारोहक होते. पहाटे त्यांनी काठमांडू ते बासी शहर व नंतर धारापानी (१८६० मीटर) पर्यंत वाहनाने प्रवास करून मुक्काम केला. धारापानीपासून पुढे ट्रेकला सुरुवात झाली. सर्व टीम ही तीलजे (२७०० मी.) गाव येथे दुपारचे जेवण घेऊन रात्री भीमथांग (३५९० मी.) येथे रात्री मुक्कामी थांबली. पुढील प्रवास हा भीमथांग ते धर्मशाळा (५३१४ मी.) व फेदी असा ट्रेक केला. ७ सप्टेबररोजी भीमथांग ते लारके पास (५१०६ मी.) पर्यंत दहा-बारा तासांचा ट्रेक करत संध्याकाळी समदो गाव (३८०० मी) येथे पुढील दोन दिवस मुक्काम केला.

अखेर शेख यांच्यासह टीमने शिखर केले सर

पुढील तीन दिवस मनास्लू बेस कॅम्प येथे अनुकूल हवामानाची प्रतीक्षा करण्यात आली. त्यानंतर २२ सप्टेबररोजी रफिक शेख यांच्यासह सर्व टीमने शेर्पाच्या मदतीने मोहिमेला रवाना झाले. अखेर २६ सप्टेंबररोजी पहाटे ७.२० वाजता मोहीम फत्ते करण्यात आली

शिखर सर करण्याची परवानगी

शेख रफिक व टीमने ११ सप्टेंबररोजी सामदो येथून मनास्लू बेस कँपच्या दिशेने प्रवास सुरू केला. एक दिवस विश्रांती पुढील दोन दिवस बेस कॅम्प ते कॅम्प १ व कॅम्प २ आणि नंतर परत कॅम्प २ पासून बेस कॅम्प असे रोटेशन केले. पुन्हा एक दिवस विश्रांती आणि पुढील चार दिवस पुन्हा बेस कॅम्पपासून कॅम्प १, कॅम्प २ व शेवटी कॅम्प ३ येथून परत बेस कॅम्प असे रोटेशन पूर्ण करत ६८०० मीटर उंची गाठली. या प्रक्रियेमुळे शेख रफिक व टीमला मनास्लू शिखर सर करण्यासाठी अधिकृत परवानगी मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT