sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : कोंडी,कसरत अन् सुटका! रेल्वेगेट बंद झाल्याच्या पहिल्याच दिवशीची परिस्थिती

संग्रामनगर उड्डाणपुलावर वाहनधारकांच्या रांगाच रांगा केवळ ६२० मीटर अंतर पार करायला लागला अर्धा तास

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या कामासाठी रेल्वे गेट वर्षभर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या पहिल्याच दिवशी रविवारी (ता. १५) संग्रामनगर उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली. उड्डाणपुलावर वाहनधारकांची गर्दी वाढल्याने लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या. ६२० मीटर लांबीचा हा पूल ओलांडण्यासाठी एका वाहनास २० ते ३० मिनिटांचा वेळ लागला. दुसरीकडे बंद गेटच्या खालून वाहने काढण्यासाठी वाहनधारकांची धोकादायक धडपड सुरूच होती.

अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात होत आहे. या कामाचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. त्यामुळे आता शिवाजीनगर रेल्वेगेट वर्षभरासाठी बंद करण्यात आले आहे. दुपारी दोननंतर गेट बंद केल्यानंतरही या मार्गावरून दुचाकीस्वार गेटच्या खालून धोकादायक पद्धतीने वाहने काढण्याचा प्रयत्न करीत होते. गेट खालून, रेल्वे पटरीवरून जिथे जागा मिळेल तेथून वाहने, सायकल नेण्याचा प्रयत्न काहींनी केला. ही कसरत करत असताना अनेक जणांना दुखापती झाल्या.

वाहनांचे नुकसान झाल्याचे बघावयास मिळाले. दरम्यान, वाहनधारकांना पर्यायी सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे संग्रामनगर उड्डाण पुलाचा मार्ग आहे. या पुलावर वाहनांची प्रचंड संख्या वाढल्याने दिवसभर वाहतुकीची कोंडी होती. एका वाहनाला पूल ओलांडण्यासाठी तब्बल २० ते ३० मिनिटांचा वेळ लागला. सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक कोंडीची समस्या कायम होती. यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला.

दुप्पटीने वाढली वाहनांची ये-जा

या उड्डाणपुलावरून आतापर्यंत रोज साधारण १२ ते १५ हजार वाहनांची ये- जा होत होती. दरम्यान, शिवाजीनगर रेल्वे गेट वर्षभरासाठी बंद केल्याने आता संग्रामनगर उड्डाण पुलावर वाहनांची संख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.

संग्रामनगर उड्डाणपुलावर वाहनधारकांच्या रांगाच रांगा

केवळ ६२० मीटर अंतर पार करायला लागला अर्धा तास

रेल्वेगेट बंद झाल्याच्या पहिल्याच दिवशीची परिस्थिती

असा आहे पूल पुलाची लांबी ६२० मीटर दर्ग्याच्या बाजूला २० मीटरचे ११ गर्डर बीड बायपासच्या बाजूला २० मीटरचे ७ गर्डर नियमित वाहतूक १२ ते १५ हजार वाहने (अंदाजित) उद्‍घाटन २८ जानेवारी २०१४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT