sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : दौलताबाद घाटात वाहतूक ठप्प; प्रवाशांना मनस्ताप, वाहनांच्या चार किलोमीटरपर्यंत रांगा

या दरवाजात जवळपास प्रत्येक रविवारी किंवा सुटीच्या दिवशी वाहतूक ठप्प होते.

सकाळ वृत्तसेवा

दौलताबाद/खुलताबाद - दौलताबाद घाटा खालील ऐतिहासिक दरवाजात रविवारी (ता.८) वाहतूक ठप्प झाल्यामुळे महामार्ग ठप्प झाला होता. यामुळे घाटामार्गे प्रवास करणाऱ्या पर्यटकांसह भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला. वाहनांच्या जवळपास ४ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. दुपारी ३ वाजता ठप्प झालेली वाहतूक अखेर ५ वाजता सुरु झाली. मात्र, तोपर्यंत प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला.

रविवार असल्यामुळे पर्यटकांसह भाविकांची मार्गावर जास्त वाहनांची गर्दी होती. दौलताबाद घाटात दुपारी तीन ते पाच वाजेच्या सुमारास वाहनांच्या वर्दळीमुळे रहदारी ठप्प झाली. याचा मनस्ताप मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना झाला. ही वाहतूक कोंडी ही कागजीपुरा गाव ते देवगिरी किल्ला प्रवेशद्वारापर्यंत अशी ४ किलोमीटर पर्यंत होती.

सध्या खुलताबाद येथील उरुस व शनिवार रविवारच्या सलग सुट्ट्या व शालेय सहलींचा हंगाम सुरू असल्यामुळे तसेच देश विदेशासह शहरातील विकेन्डला पर्यटनासाठी येणारे पर्यटक यांनी दौलताबाद, वेरूळ, खुलताबाद, म्हैसमाळ, पितळखोरा लेणी आदी पर्यटन स्थळांना भेटी देत आहेत. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. या दरवाजात जवळपास प्रत्येक रविवारी किंवा सुटीच्या दिवशी वाहतूक ठप्प होते. मात्र, याकडे कुणीही लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

संबंधित विभागाचा काणाडोळा

येथील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावावी व पर्यायी रस्ता तत्काळ करावा असे छत्रपती संभाजी नगर खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेत आदेशित केले आहे. परंतु प्रशासनाने अद्याप कुठलीही उपाय योजना केलेली आढळत नाही. यामुळे पर्यटक व भाविक यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने पर्यायी रस्त्याचे काम सुरु करावे अशी मागणी पर्यटक, भाविकांनी केली आहे.संबंधित विभागाचा काणाडोळा

येथील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावावी व पर्यायी रस्ता तत्काळ करावा असे छत्रपती संभाजी नगर खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेत आदेशित केले आहे. परंतु प्रशासनाने अद्याप कुठलीही उपाय योजना केलेली आढळत नाही. यामुळे पर्यटक व भाविक यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने पर्यायी रस्त्याचे काम सुरु करावे अशी मागणी पर्यटक, भाविकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT