sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद भाजपकडे जाणार?

काँग्रेस पक्षाच्या हालचाली सुरु शिंदेगटाचे सध्या मौन

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अर्जुनराव गाढे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर रिक्त झालेल्या उपाध्यक्षच्या जागेसाठी चांगलीच चुरस वाढली आहे. अध्यक्षपद शिंदे गटाला गेल्यामुळे भाजपला उपाध्यक्षपद देण्याचे ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दुसरीकडे महाविकास आघाडी असताना उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसने शब्द मिळाल्यामुळे त्यांना माघार घेतली होती. यामुळे आतातरी हे पद मिळेल यासाठी काँग्रेसनेही हालचाली सुरु केल्याचे चित्र आहे.

जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष नितीन पाटील यांच्या कारभाराविषयी नाराज झालेल्या सर्व संचालकांनी त्यांना राजीनामा देण्याची मागणी केली होती. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी उपाध्यक्ष असलेले अर्जुनराव गाढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेच्या वेळी अर्जुनराव गाढे यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या रिक्त जागेचा अहवाल बँकेतर्फे विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

गेल्या वेळीही उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. त्यानंतर काहीजण अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. आता ते उपाध्यक्षपदासाठी इच्छुक आहे. यात अभिषेक जैस्वाल, सुहास शिरसाट, दिनेश परदेशी, जगन्नाथ काळे, अप्पासाहेब पाटील, नितीन पाटील, कृष्णा पाटील डोणगावकर, जावेद पटेल हे इच्छुक आहेत.

बागडे-सत्तार ठरवणार तोच उपाध्यक्ष

अर्जुनराव गाढे यांना बिनविरोध करण्यासाठी अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी सर्वपक्षीय संचालकांची मोट बांधली. एवढे नव्हे तर आपला सच्चा कार्यकर्ता असलेले अर्जुनराव गाढे पाटील यांना त्यांनी अध्यक्ष बनवित बँकेच्या तिजोरीच्या स्वत:जवळ ठेवल्या. सत्तारने ठरवलेला अध्यक्ष झाला. आता आमदार हरिभाऊ बागडे आणि सत्तार ठरवणार तोच उपाध्यक्ष होईल. दुसरीकडे प्रमुख्याने मुस्लिम चेहरा देण्याची हालचाली सुरु असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT