g shrikant 
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhajinagar : पालिका आयुक्तांनी केली तपासणी! तीनपैकी एका लिपिकाला टायपिंगही जमत नाही

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांची ‘खायला काळ आणि भुईला भार’ अशी अवस्था आहे. कोणत्याही विभागात बदली करा, अनेकांना कामच जमत नाही. महापालिका मात्र त्यांच्या वेतनावर वर्षाला लाखो रुपये खर्च करते.

शुक्रवारी प्रशासक जी. श्रीकांत यांनी शिक्षण विभागातील लिपिकांना टायपिंग करून दाखविण्याचे आदेश दिले, पण तीन पैकी एका महिला लिपिकाला टाइप करता आले. त्यावर संतप्त झालेल्या प्रशासकांनी तुमच्यावर महिन्याला ४५ हजारांचे वेतन कशाला खर्च करायचे? असा प्रश्‍न केला.

प्रशासक जी. श्रीकांत यांनी महापालिकेतील विविध विभागांना शुक्रवारी भेटी दिल्या. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या सभागृहाचे सध्या नूतनीकरण सुरू असून, हे काम पाहण्यासाठी जी. श्रीकांत गेले, पण सभागृहाला कुलूप असल्याने त्यांनी आपला मोर्चा विविध विभागांकडे वळविला. डीपी युनिटसाठी दिलेल्या कार्यालयापासून त्यांनी सुरवात केली.

त्यानंतर ते विधी सल्लागार, आस्थापना, एनयूएलएम, कामगार व शेवटी शिक्षण विभागात पाहणी केली. शिक्षण विभागात काही महिला कर्मचारी बसलेल्या होत्या. त्यांनी यातील लिपिक कोण कोण आहेत? अशी विचारणा केली. तीन महिलांनी आम्ही लिपिक असल्याचे सांगितले. त्यांच्या सोबत एक कंत्राटी कर्मचारी होता. तो संगणकावर काम करत होता. त्याला बाजूला करून जी. श्रीकांत यांनी महिला कर्मचाऱ्यांना टायपिंग करून दाखविण्यास सांगितले.

एका महिलेने मी खूप घाबरले आहे, असे कारण दिले. दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याने मी टायपिंग शिकत आहे, असे उत्तर दिले. एका महिला कर्मचाऱ्याने मात्र टायपिंग करून दाखविली. त्यावर ज्या कर्मचाऱ्यांना टायपिंग येत नव्हती त्यांना उद्देशून जी. श्रीकांत यांनी तुम्हाला वेतन किती मिळते अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी चाळीस ते ४५ हजारांचा आकडा सांगितले.

टायपिंगच येत नसेल तर तुम्हाला एवढा पगार कशासाठी द्यायचा? असा प्रश्‍न केला. दरम्यान जी. श्रीकांत यांनी सर्व कर्मचाऱ्यांना ॲपमध्ये माहिती भरून देण्याची सूचना केली आहे.

कायम पेक्षा कंत्राटी कर्मचाऱ्याला जास्त काम

यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्याला जी. श्रीकांत यांनी वेतन विचारले असता, त्याने नऊ हजार ५०० रुपये मिळतात, असे सांगितले. अनेक विभागात कायम कर्मचाऱ्यांपेक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांनाच जास्तीचे काम असल्याचे चित्र आहे. वेतन मात्र कायम कर्मचाऱ्याचे चार ते पाच पटीने जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Digital Governance 174 Systems : सरकारी कार्यालयांमधील चकरा थांबणार! मुख्यमंत्र्यांकडून १७४ डिजिटल प्रणालींचे लोकार्पण; प्रजासत्ताक दिनापासून राज्यात 'झिरो ब्युरोक्रसी' आणि पेपरलेस प्रशासन!

AgriStack Farmer ID Maharashtra : महाराष्ट्राची देशात मोठी भरारी! १.४४ कोटी शेतकऱ्यांची 'अ‍ॅग्रीस्टॅक' नोंदणी पूर्ण; उर्वरित शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कसा काढावा? कृषिमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन

Latest Marathi News Live Update: एन. चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्ट्सचे मुंबई हायकोर्टात आव्हान

Honour Killing: साखरपुड्याच्या आदल्या दिवशी १९ वर्षीय तरुणीची हत्या; जन्मदात्या पित्यानेच आवळला गळा?

Parliament Special Sitting Schedule : संसदेचे ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान विशेष कामकाज! लोकसभा आणि राज्यसभेच्या बैठकांबाबत किरेन रिजिजू यांची अधिकृत घोषणा

SCROLL FOR NEXT