Crime News esakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : सहा धारदार तलवारी विक्रीच्या तयारीतील एकास ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखेचे सहायक फौजदार शेख हबीब यांना एकजण धारदार तलवारी विक्रीसाठी घेऊन आल्याची माहिती मिळाली होती.

सकाळ वृत्तसेवा

Chhatrapati Sambhaji Nagar Crime - सहा धारदार तलवारी विक्रीच्या तयारीत असलेल्या एकाला गुन्हे शाखेने पकडले. ही कारवाई १९ जून रोजी रेल्वेस्थानक भागात करण्यात आली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सहा धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. बबलुसिंग कालुसिंग भोंड (२८, रा. अलाना कंपनीसमोर, चितेपिंपळगांव, ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखेचे सहायक फौजदार शेख हबीब यांना एकजण धारदार तलवारी विक्रीसाठी घेऊन आल्याची माहिती मिळाली होती. उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांना सदर माहिती देण्यात आली. म्हस्के यांनी पथकासह रेल्वेस्थानक गाठत सापळा लावला असता, आरोपी भोंड हा संशयितरित्या जाताना त्याला पोलिसांनी पकडले.

त्याच्या पिशवीची झडती घेतली असता, कपड्यात गुंडाळलेल्या सहा धारदार तलवारी दिसल्या. मात्र त्याने चौकशी तलवारी कुठून आणल्या, कुठे विक्री करायच्या होत्या यासंदर्भात तोंड उघडले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

भोंडविरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई उपनिरीक्षक म्हस्के यांच्यासह सतीश जाधव, शेख हबीब, सुधाकर मिसाळ, पोपट मनगटे, संजयसिंह राजपुत, राजाराम डाखुरे यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Accident : महामार्गावर ट्रॅव्हल अन् ‘ट्रेलर’चा भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

ठरलं तर मगची घसरण कायम पण तू हि रे माझा मितवाने गड राखला ; जाणून घ्या या आठवड्याचा टीआरपी

Bhiwandi: भिवंडी महापालिकेत बदलींचा धडाका, कामगार संघटनांची तीव्र नाराजी; कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

Jyotiba Temple : २५९ कोटींचा विकास आराखडा; जोतिबा-यमाई मंदिराचा होणार भव्य कायापालट

SCROLL FOR NEXT