chhatrapati sambhaji nagar gabbar letter for corrupt police officer death threat crime news  Esakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime: रिश्वत मत लेना, गब्बर आ जायेगा! संभाजीनगरमध्ये पत्राने खळबळ; राजकीय नेत्यांसह पोलिसांच्या हत्याकांडाची धमकी

Sambhajinagar News : पोलिस महासंचालक कार्यालयाच्या नावाने निनावी पाठवण्यात आलेल्या एका पत्राने सोशल मीडियावर खळबळ माजली. ‘गब्बर’ असे टोपणनाव लिहिलेल्या या व्यक्तीने बिडकीन पोलिस ठाण्यात अराजकता माजली असल्याचा खळबळजनक आरोप केला.

अंकिता खाणे (Ankita Khane)

छत्रपती संभाजीनगर: पोलिस महासंचालक कार्यालयाच्या नावाने निनावी पाठवण्यात आलेल्या एका पत्राने सोशल मीडियावर खळबळ माजली. ‘गब्बर’ असे टोपणनाव लिहिलेल्या या व्यक्तीने बिडकीन पोलिस ठाण्यात अराजकता माजली असल्याचा खळबळजनक आरोप केला. ही अराजकता न थांबल्यास राजकीय नेत्यांसह पोलिस अधिकाऱ्यांचे हत्याकांड करणार असल्याची धमकी या पत्रात दिली. याप्रकरणी पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया म्हणाले, ‘‘हा प्रकार आता आपल्यासमोर आला. याबाबत अधिकृत पत्र महासंचालक कार्यालयाकडून आल्यानंतर चौकशी करू,’’ असे त्यांनी सांगितले.

पोलिस महासंचालक कार्यालयाला टपालाने पाठवलेल्या या पत्रावर १७ जानेवारी २०२४ चा शिक्का आहे. पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीने स्वतःचा अर्जदार म्हणून ‘कायदा आणि सुव्यवस्थेला कंटाळलेला गब्बर’ असा उल्लेख केला. या पत्राचा आशय पुढीलप्रमाणे ः अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी आहे. बिडकीन पोलिस ठाण्यात काही वर्षांत स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांमुळे हप्तेखोरी वाढली. तसेच येथील २२ जणांचा उल्लेख केला असून, यांची परिसरात दहशत पसरली आहे. ही मंडळी राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला आहे.

गोरगरिबांवर अत्याचार सुरू असून, हा प्रकार थांबला नाही. तसेच प्रामाणिक अधिकारी या भागात बसवले नाही तर मोठे हत्याकांड घडवून आणू आणि या हत्याकांडाची सुरवात पोलिस अधिकाऱ्यांपासून करू. यानंतर जिल्ह्यात कोठेही अत्याचार झाल्यास आणि आरोपी राजकीय नेत्यांचे समर्थक असतील, त्यांना जर नेते मंडळींनी वाचवण्याचा प्रयत्न केला तर आमची गँग अशा नेत्यांना ठार मारेल. आमच्या १०० जणांची टोळी आहे.

काही झाल्यास गँग बदला घेणार आहे, असा आशय या पत्राचा आहे. पत्राखाली सूचना लिहिताना ते लिहिणाऱ्याने त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेते मंडळींची असून, त्याला काही झाल्यास नेते मंडळींना ठार मारण्याची धमकी पुन्हा एकदा पत्रात दिली. शिवाय यानंतर बिडकीनच्या गावगुंडाचा कुठल्याही केसमध्ये हस्तक्षेप झाला नाही पाहिजे, तसेच पत्रात नाव घेतलेल्या राजकीय गुंडांनी कायद्याच्या चौकटीत राहावे; अन्यथा त्यांचा शरद मोहोळ किंवा गजू तौर करू अशी धमकी दिली आहे.

चित्रपटाची आठवण

अभिनेता अक्षयकुमार याचा ‘गब्बर’ हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हत्या नायक करतो, अशी या चित्रपटाची कथा आहे. या पत्रातील व्यक्तीने देखील स्वतः गब्बर असल्याचा उल्लेख करीत ‘रिश्वत मत लेना, गब्बर आ जायेगा’ अशी टीप पत्रात लिहिली आहे. त्यामुळे या चित्रपटाची आठवण झाली आहे.

हा प्रकार आताच आमच्या समोर आला. पत्रात उल्लेख केलेले पोलिस अधिकारी संतोष माने, गणेश सुरवसे यांची बदली पूर्वीच दुसऱ्या जिल्ह्यात झाली आहे. हे पत्र अधिकृत आम्हाला भेटल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येणार आहे, असे छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: आई कुठे आहे बाबा? वडिलांचं उत्तर ऐकून मुलं सुन्न झाली… "मी तुमच्या आईला मारले, तिला पुरून टाका"

Sunil Bagul : व्हिडिओ हटविण्याच्या वादातून घरात घुसून मारहाण; बागूल यांची अटकपूर्व सुनावणी पुढे ढकलली

Latest Maharashtra News Updates : २ तासांच्या तणावानंतर अखेर मोर्चाला परवानगी; ठरलेल्या मार्गावरूनच निघाला मोर्चा

Nashik Citylink Bus : नाशिक सिटीलिंक बससेवेला ४ वर्षे पूर्ण; ८ कोटींहून अधिक प्रवासी, २४३ कोटींचा महसूल

Shravan Month 2025 Festivals List: श्रावण महिना- सणांचा थाट, आनंदाचा बहर, जाणून घ्या महत्त्व अन् श्रावण महिन्यात येणारे सण

SCROLL FOR NEXT