chhatrapati sambhaji nagar water supply off two days jayakwadi electricity cut off  esakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar : सलग दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठ्यावर संकट; जायकवाडीत वीज खंडितचा परिणाम

शहराच्या सर्वच भागातील पाण्याचे नियोजन कोलमडले असून नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : फारोळा येथील मॅनिफोल्ड पाईपची दुरुस्ती होत नाही तोच जायकवाडी येथे वीज अचानक खंडित झाल्याने महापालिकेच्या दोन्ही योजना बंद पडल्या. त्यामुळे शहरात येणारे पाणी बंद झाले व सलग दुसऱ्या दिवशी शहराच्या बहुतांश भागात पाण्याचा ठणठणाट होता. काही भागातील पाण्याचे टप्पे एक दिवसाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

शहराच्या पाणी पुरवठ्यात वारंवार व्यत्यय येत आहे. सोमवारी (ता. तीन) सकाळी फारोळा येथील ७०० मिलिमीटर व्यासाच्या मॅनिफोल्ड पाइप फुटला. त्यामुळे पाणी उपसा बंद पडला. पाइपच्या दुरुस्तीसाठी महापालिकेला तब्बल १४ तासाचा कालावधी लागला.

रात्री ९ वाजेच्या सुमारास पाणी उपसा पुर्ववत झाला. त्यानंतर मध्यरात्री एक वाजता अचानक जायकवाडी येथे स्पार्किंग झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे दोन्ही योजनेचा पाणी उपसा बंद पडला. मंगळवारी पहाटे पाच वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला.

चार तास शहरात येणारे पाणी बंद झाल्यामुळे जलकुंभ भरले नाहीत. जुने शहर, सिडको-हडको, गारखेडा, शिवाजीनगर, भीमनगर-भावसिंगपूरा, विद्यापीठ परिसर, लेबर कॉलनी, चिकलठाणा, मुकूंदवाडी भागातील पाणीपुरवठ्याला फटका बसला.

ज्या भागात काल पाणी पुरवठा होऊ शकला नव्हता, त्या भागाला दुपारी १२ वाजेनंतर पाणीपुरवठा करण्यात आला. काही भागाला तब्बल सहा ते सात तास उशिराने पाणी देण्यात आले. शहराच्या सर्वच भागातील पाण्याचे नियोजन कोलमडले असून नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT