chhatrapati sambhaji nagar zp building in final 15 august in cooperation  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : ‘झेडपी’ची इमारत अंतिम टप्प्यात; १५ ऑगस्टपूर्वी नवीन वास्तूमधून चालणार कारभार

जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले. यामुळे १५ ऑगस्टपूर्वी काही विभागांचे कामकाज या इमारतीतून सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले. यामुळे १५ ऑगस्टपूर्वी काही विभागांचे कामकाज या इमारतीतून सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिली.

जिल्हा परिषदेची मुख्य प्रशासकीय इमारत हेरिटेज बिल्डिंग म्हणून पुरातत्त्व विभागाने घोषित केली. यामुळे मुख्य इमारतीला बाधा न पोचविता परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर ४७.३३ कोटींची नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात येत आहे.

यात २०२१ ला सुरू झालेले या इमारतीचे बांधकाम आज अंतिम टप्प्यात आले आहे. यात चारमजली इमारत उभी झाली. यातील काही कामच शिल्लक राहिले. नुकतेच विकास मीना यांनी इमारतीची पाहणी करीत आढावा घेतला.

यावेळी काही खोल्यांमध्ये बदल करण्याची त्यांनी सूचना केली. यावेळी अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) ओमप्रकाश रामावत, बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.

शिक्षण, पंचायत विभाग, आरोग्य विभाग

नवीन इमारतीच्या बांधकामासाठी जागा मोकळी करण्यात आली. त्यावेळेस काही विभाग हे इतरत्र स्थलांतरित करण्यात आले. यातील महत्त्वाचे शिक्षण, पंचायत विभाग, आरोग्य, समाजकल्याण यासह इतर विभागांचे काम पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर सुरू करण्यात येणार आहे. यासाठीच्या लागणाऱ्या खोल्यांची तत्काळची व्यवस्था करण्याच्या सूचना मीना यांनी दिल्या आहेत.

बारा कोटी मंजूर करून रक्कम खात्यात वळती

मूळ ४७ कोटींच्या इमारतीची तयारी झाली. उर्वरित कामासाठी लागणाऱ्या खर्चासाठी वाढीव ५३ कोटींचा प्रस्ताव ग्रामविकास मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. या विभागाच्या वतीने बारा कोटींचा प्रस्ताव मंजूर करून रक्कम जिल्हा परिषदेच्या खात्यात वळती केली आहे. या निधीमुळे उर्वरित राहिलेल्या कामांना गती आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT