Chhatrapati Sambhajinagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : पर्यटकांची पावले वळणार शहराकडे!

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहराच्या पर्यटन धोरणांतर्गत २५ ते ३० ऐतिहासिक स्थळांवर अधिकाधिक पर्यटक आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच शहरात डबल डेकर बस आणि ‘नाइट लाइफ’ सुविधा सुरू होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहर राज्याची पर्यटनाची राजधानी आहे. पर्यटनाच्या राजधानीत देश-विदेशातील लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात. पण, हे पर्यटक वेरूळ-अजिंठा लेणी पाहून माघारी जातात. त्यांचा शहरात मुक्काम राहिला तर शहरातील रोजगार वाढतील.

पर्यटकांनी शहरात बीबी का मकबरा, पाणचक्की, सोनेरी महल, ऐतिहासिक दरवाजे, बुद्ध लेण्या, नहर-ए-अंबरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, मौलाना आझाद संशोधन केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय, क्रांती चौक येथील शिवसृष्टी यासह इतर पर्यटनस्थळे पाहावित, यासाठी नियोजन करण्याची केवळ चर्चाच सुरू होती.

त्यात महापालिकेने एक पाऊल पुढे टाकत विद्यापीठाच्या पर्यटन विभागाला सोबत घेत शहराचे पर्यटन धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन धोरणाचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून, आगामी दोन महिन्यांत ते अंतिम होईल. यानुसार शहरातील २५ ते ३० ऐतिहासिक स्थळांवर जास्तीत जास्त पर्यटक आणण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

पर्यटकांची पावले शहराकडे वळणार!

त्यासाठी डबल डेकर बस खरेदीची प्रक्रिया अंतिम झाली असून, लवकरच या बस रस्त्यावर धावताना दिसतील.

‘नाइट लाइफ’कडे दुर्लक्ष

शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठी ‘नाइट लाइफ’ची मागणी काही वर्षांपासून केली जात आहे. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, संघटनांसह तज्ज्ञदेखील यासंदर्भात मागणी करीत आहेत. त्यानुसार महापालिकेने पोलिसांकडे शहरात ‘नाइट लाइफ’ सुरू करण्याची मागणी केली. त्यात जालना रोड रात्री दोन वाजेपर्यंत सुरू ठेवावा, अशी सूचना करण्यात आली होती, पण सध्या कागदोपत्री खेळ सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT