chhatrapati sambhajinagar crime update women missing find wife village closed police esakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : पत्नी शोधून द्या, अन्यथा गाव बंद!

गोंदेगाव येथील घटनेची चर्चा; तीन मुलांच्या आईला गावातील एका तरुणाने ११ जुलै रोजी फूस लावून पळवून नेल्याचे रविवारी उघड

सकाळ वृत्तसेवा

सोयगाव : सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील तीन मुलांच्या आईला गावातील एका तरुणाने ११ जुलै रोजी फूस लावून पळवून नेल्याचे रविवारी उघड झाले. यावर ‘माझ्या पत्नीचे अपहरण करणारा तरुण आणि त्याच्या कुटुंबातील लोकांचा शोध घेऊन गुन्हा दाखल करावा, अन्यथा गाव बंद करण्यात येईल’, असा इशारा बेपत्ता महिलेच्या पतीने दिला आहे.

विशेष त्याच्या या हाकेला गावातील अनेकांनी पाठिंबाही दिला आहे. गोंदेगाव येथील युवक गावातील एका विवाहित आणि तीन मुलांची आई असलेल्या महिलेला घेऊन पळून गेला. महिलेच्या पतीने गावात आणि नातेवाइकांकडे पत्नीचा शोध घेतला.

मात्र, ती कोठेही आढळून आली नाही. त्यामुळे शेवटी हतबल पतीने पोलिसांत पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पत्नीला फूस लावून पळवून नेण्यात आले असून, तिचे धर्मांतर करण्याची शक्यता असल्याचा आरोप पतीने केला आहे. या प्रकाराची जोरदार चर्चा होत आहे.

पत्नीचा घातपात होण्याची शक्यता

संबंधित विवाहिता ही पती आणि तीन अपत्यांसोबत गावात राहत होती. शेतकामात ती पतीला मदत करत असे. मात्र, ११ जुलै रोजी गावातील एका तरुणाने आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याचा आरोप पतीने केला आहे.

तो युवक महिलेपेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. तरुणासोबतच त्याच्या कुटुंबातील सदस्य देखील गावातून घर सोडून कोठेतरी निघून गेल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे माझ्या पत्नीचा शोध घ्या, अन्यथा तिचा घातपात होण्याची शक्यता तक्रारदार पतीने वर्तवली आहे.

ग्रामस्थांचाही आंदोलनात सहभाग

पतीने १२ जुलै रोजी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर १५ जुलै रोजी आपल्या पत्नीला फूस लावून तिचे अपहरण केल्याची तक्रार पतीने दिली. तिचा लवकरात लवकर शोध घेण्यात यावा, अन्यथा १७ जुलै, सोमवारी गाव बंदची हाक या तरुणाने दिली आहे.

त्याच्या हाकेला गावकऱ्यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. यानंतर देखील सुद्धा शोध लागला नाही तर गावातील तरुण, युवक व ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT