Loksabha Election 2024  sakal
छत्रपती संभाजीनगर

Loksabha Election 2024 : गुढीपाडव्याचा मुहूर्तही टळला! ; महायुतीत छत्रपती संभाजीनगराचा तिढा कायम

महायुतीकडून लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदार संघातून कुठला पक्ष निवडणूक लढवणार? उमेदवार कोण असेल? यावरून अद्यापही रस्सीखेच सुरूच आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उमेदवाराची घोषणा होईल, असे कार्यकर्त्यांना अपेक्षित होते. पण, हा मुहूर्त टळला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, ता. ९ ः महायुतीकडून लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदार संघातून कुठला पक्ष निवडणूक लढवणार? उमेदवार कोण असेल? यावरून अद्यापही रस्सीखेच सुरूच आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उमेदवाराची घोषणा होईल, असे कार्यकर्त्यांना अपेक्षित होते. पण, हा मुहूर्त टळला. त्यामुळे या जागेचा तिढा कायम आहे. एकीकडे ही जागा आम्हाला सुटेल असा दावा शिंदे गटाचे पदाधिकारी करत असताना दुसरीकडे भाजप अद्यापही प्रयत्न सोडायला तयार नाही. दरम्यान, दोन दिवसांत या बाबत निर्णय होऊ शकतो.

‘आजवर युतीत येथून आम्हीच लढलो आहोत. त्यामुळे संभाजीनगरची जागा ही आमची पारंपरिक सीट आहे, ती आम्ही जिंकणार आहोत मग सोडणार कशी?’ असा दावा शिवसेना शिंदे गटाकडून केला जात आहे. दुसरीकडे या मतदारसंघात आम्ही तीन वर्षांपासून काम करत आहोत. बूथस्तरापर्यंत आम्ही पोचलो आहोत. त्यामुळे आम्ही ही जागा लढलो तर दोन लाखांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा भारतीय जनता पक्षाकडून केला जात आहे. असे दावे सुरूच असल्याने, वरिष्ठ स्तरावरून याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. मंगळवारी पाडव्याच्या मुहूर्तावर याबाबत घोषणा होणे अपेक्षित होते. परंतु, अद्यापही दोन्ही पक्षाकडून रस्सीखेच सुरू असल्याने लढणार कोण आणि उमेदवार कोण असणार याबाबत अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही.

इच्छुकांचे निर्णयाकडे डोळे

भाजपकडून इच्छुक असलेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या, मराठवाड्यातील तीन लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला सुरवात केली. पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असे मंत्री कराड यांचे म्हणणे आहे. शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक असलेले मंत्री संदीपान भुमरेदेखील युतीचा उमेदवार निवडून आणायचा म्हणून बैठका घेत आहेत. या दोन्ही पक्षातील इच्छुकांचे डोळे मात्र छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून कुठला पक्ष लढणार आणि उमेदवार कोण याकडे लागले असल्याचे बोलले जाते.

भाजप पदाधिकाऱ्यांचा फडणवीसांना फोन

पालकमंत्री भुमरे आणि शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांची शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या कार्यालयात नुकतीच बैठक पार पडली. या पाठोपाठ भाजप पदाधिकाऱ्यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. यावेळी पहिल्या फळीतील एका भाजप नेत्याचे फडणवीस यांच्याशी बोलणे झाले. यामुळे तूर्तास तरी दोघांच्या आशा कायम असल्याचे बोलले जात आहे.

भूकंपही नाही अन् घोषणाही नाही

शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट वारंवार शिवसेनेचा उमेदवार जाहीर होण्याचे मुहूर्त सांगत आहेत. शिवाय तीन आठवड्यापूर्वी त्यांनी मोठा राजकीय भूकंप होणार, असे भाकीत केले होते. पण, हा भूकंपही झाला नाही आणि शिरसाट यांनी सांगितलेला मुहूर्त साधला गेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT