knief attack sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : नाचताना धक्का लागल्याने तरुणास भोसकले

हळदीच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून पोटात चाकूने भोसकले.

सकाळ वृत्तसेवा

हळदीच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून पोटात चाकूने भोसकले.

छत्रपती संभाजीनगर - हळदीच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून भावासोबत वाद होत असताना सोडविण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या भावाला ‘आज तुला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत त्याच्या पोटात चाकूने भोसकले. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला. ही खळबळजनक घटना सात मे रोजी रात्री साडेदहा वाजता पडेगाव येथील पोलिस कॉलनीत घडली.

याप्रकरणी गंभीर तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, नंतर घाव जास्त असल्याने गंभीर अवस्थेत त्याला अधिक उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी जखमी तरुणाचा जबाब घेत चाकूहल्ला करणाऱ्याविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, सूरज भुजबळ (रा. छावणी) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

छावणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्की ऊर्फ विकास जनार्धन भडके (२१, रा. सावतानगर, पडेगाव) हा कार चालवून उदरनिर्वाह भागवितो. सात मे रोजी विक्की भडके याचा मित्र विक्की बोराडे याची पडेगावातील पोलिस कॉलनीत हळद असल्याने विक्की, त्याचा भाऊ आकाश भडके, मित्र सागर जंगळे, इजाज यांच्यासोबत हळदीला गेला होता.

रात्री साडेदहा वाजेदरम्यान हळदीच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचत असताना आकाश याचा विक्कीचा मित्र सूरज भुजबळ याला धक्का लागला. दरम्यान, एकीकडे फिर्यादीचा भाऊ आकाश तर सूरज हा विक्कीचा मित्र असल्याने विक्की हा सुरजला समजावून सांगत होता. मात्र सुरजने काही न ऐकता विक्कीला ‘मी आज तुला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत चाकू काढला आणि विक्की याला काही कळण्याच्या आत त्याच्या पोटात भोसकले. गंभीर जखमी विक्की याला भाऊ आकाश, अशोक मगर यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले.

गंभीर जखमी झाल्याने प्राथमिक उपचार करुन विक्की याला घाटीत दाखल करण्यात आले. या प्रकरणी सूरज भुजबळविरोधात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI Ranking: शुभमन गिल पुन्हा नंबर १! रोहित शर्मा, विराट कोहली कितव्या स्थानावर? टॉप २० मध्ये भारताचे पाच फलंदाज

Supreme Court : दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय! राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस

कोळसा घोटाळा प्रकरणी मनमोहन सिंग यांना क्लीन चिट, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Vaibhav Sooryavanshi : पोट्ट्याची मोठी झेप! वैभव ICC Ranking मध्ये २३० स्थानांनी पुढे आला; बघा जगात कितव्या क्रमांकावर पोहोचला?

Live Marathi News Update : अटक करण्यात आलेल्या ३ माओवाद्यांनी १०० हून अधिक सुरक्षा कर्मचाऱ्यांची हत्या केली

SCROLL FOR NEXT