chhatrapati sambhajinagar market gulmandi remove encroachment municipal action Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar : गुलमंडीने घेतला श्वास; कुंभारवाडा, रंगारगल्लीत हटविली व्यापाऱ्यांची अतिक्रमणे

गुलमंडी, रंगारगल्ली, कुंभारवाडा, सराफा, सिटीचौक, शहागंज, टिळकपथ, औरंगपुरा हा मुख्य बाजारपेठेचा भाग आहे

सकाळ वृत्तसेवा

Chhatrapati Sambhaji Nagar : शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडी भागात अनेक व्यापाऱ्यांनी दुकानांसमोर ओटे, पत्र्याचे शेड करून अतिक्रमण केले होते. त्यामुळे या भागातील रस्ते अरुंद होऊन ग्राहकांना या भागातून पायी चालणे देखील अवघड झाले होते.

त्यामुळे महापालिकेने सोमवारी (ता. ११) कुंभारवाडा, रंगारगल्ली, गुलमंडीसह इतर भागातील ३५ अतिक्रमणे हटविली. त्यामुळे अनेक वर्षानंतर या भागातील रस्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला.

शहरातील गुलमंडी, रंगारगल्ली, कुंभारवाडा, सराफा, सिटीचौक, शहागंज, टिळकपथ, औरंगपुरा हा मुख्य बाजारपेठेचा भाग आहे. सणासुदीच्या काळात या भागात खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी होते.

मात्र, परिसराला हातगाडीचालकांसह व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासक जी. श्रीकांत यांनी सकाळी आठ वाजता औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून ते गुलमंडी व गुलमंडीपासून ते दिवाणदेवडी व कुंभारवाडा, रंगारगल्ली या भागाची पाहणी केली. त्यांनी रस्त्यावर असलेली अतिक्रमणे काढून घेण्यासाठी व्यापाऱ्यांशी चर्चा केली व अतिक्रमण हटाव विभागाला अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले.

व्यापाऱ्यांकडून स्वागत

महापालिकेच्या या कारवाईचे गुलमंडी परिसरातील व्यापाऱ्यांनी स्‍वागत केले. हा भाग अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी वारंवार कारवाई करण्याची मागणी यावेळी काही व्यापाऱ्यांनी केली. तसेच कारवाई सुरू करताना काही व्यापाऱ्यांनी आम्हाला वेळ द्या, अशी मागणी करत विरोध केला.

प्रशासक घेणार बैठक

काही नागरिकांनी प्रशासकांची भेट घेऊन या भागात रस्ता रुंदीकरणाची मोहीम घ्यावी, अशी विनंती केली. त्यावर लवकरच या भागातील नागरिकांची बैठक घेण्यात येईल, असे प्रशासकांनी सांगितले. त्यानंतर रस्ता रुंदीकरण मोहीमसुद्धा लवकरच राबविली जाणार आहे.

  • आजच्या कारवाईत चार हातगाड्या तसेच लोखंडी टपऱ्या व किरकोळ साहित्य जप्त करण्यात आले आहे.

  • माजी खासदार तथा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या कार्यालयासमोरील अतिक्रमणेही काढण्यात आली. अनेक वर्षांपासून ही अतिक्रमणे ‘जैसे थे’ होती.

  • भाजपचे माजी नगरसेवक तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये यांनी अतिक्रमणांबाबत प्रशासकांसोबत चर्चा करून तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात ₹69,000 किमान वेतनासह जुनी पेन्शन योजनेचा प्रस्ताव

Petrol Diesel Rates update : पेट्रोल -डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका

खऱ्या आयुष्यातही सगळ्यांशी तुसडेपणाने वागतो समीर परांजपे; बायकोचा खुलासा, म्हणाली, 'आताची भूमिका सेम टू सेम'

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT