Money Recovery Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : नोकरी धोक्यात येताच करांची वसुली दुप्पट!

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या तिजोरीत दररोज ८० ते ९० लाख जमा

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - ‘मी तिकीट कलेक्टर म्हणून व जीएसटीमध्ये काम केले आहे, महापालिकेची तिजोरी कशी भरायची हे मला माहीत आहे’ असे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी वसुलीकडे विशेष लक्ष देण्यास सुरवात केली असून, ज्यांच्याकडून वसुली होणार नाही, त्यांना थेट घरी बसविले जाईल, असा इशारा त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला होता.

त्यामुळे नोकरी जाण्याच्या भीतीने कर्मचारी कामाला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी महापालिकेची दररोजची मालमत्ता कर व पाणीपट्टीची वसुली ३० ते ४० लाख रुपये होत होती, सध्या हा आकडा ८० ते ९० लाखांवरपर्यंत जात आहे.

महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी गेल्या आठवड्यात प्रभागनिहाय्य वसुली कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांना ''वसुली वाढवा, अन्यथा तर थेट घरी जावे लागेल,’ असा इशारा दिला. प्रशासकांच्या इशाऱ्यामुळे कर्मचारी कामाला लागले आहेत.

यासंदर्भात जी. श्रीकांत यांनी सांगितले की, आढावा बैठकीत कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि दररोजच्या वसुलीवर माझे लक्ष राहील, असा सूचना केल्या. त्यामुळे पूर्वी प्रतिदिन ३० ते ४० लाख रुपये कर वसूल होत होती. आता प्रतिदिन ८० ते ९० लाख रुपयांची कर वसुली होत आहे.

कंत्राटदारांचे दिले १५ कोटी रुपये

महापालिकेकडे कंत्राटदारांचे सुमारे पावणे दोनशे कोटी रुपये थकले आहेत. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर हे कंत्राटदारांवर महापालिकेत खेट्या मारत होते. त्यामुळे महापालिकेने दिवाळीत कंत्राटदारांचे १५ कोटी रुपये अदा केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT