Sandipan Bhumre  
छत्रपती संभाजीनगर

Sandipan Bhumre : "ज्यांनी गाड्या जाळल्या..." ; छ. संभाजीनगरमधील राड्यानंतर पालकमंत्र्यांचा इशारा!

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगरमध्ये किऱ्हाडपुरा भागात राडा झालेल्या ठिकाणी पालकमंत्री संदिपान भुमरे दाखल झाले आहेत. राडा झालेल्या ठिकाणाची भुमरे माहिती घेणार आहेत. याप्रकरणी संदिपान भुमरे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती देणार आहेत.

संदिपान भुमरे म्हणाले, रात्री दोन गटात राडा झाला. यावेळी गाड्या जाळण्यात आल्या त्यात पोलिसांच्या वाहनांचा देखील त्यात समावेश होता. दगडफेकसुद्धा झाली. ज्यांनी गाड्या जाळल्या त्यांच्यावर माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.पवित्र रमजानचा महिना आणि रामनवमी आहे. त्यामुळे नागरिकांनी शांतता पाळावी.

संभाजीनगरमधील राड्याच्या तपासासाठी १० पधके तयार करण्यात आले आहेत. या प्रकरणी एका जणाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहे.

किऱ्हाडपुरा येथील राममंदिराबाहेर रात्री साडेबारा वाजता दोन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यावेळी काही लोक मोठ्या संख्येने जमा झाले. यानंतर दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना आग लावली. हल्लेखोरांनी पोलिसांची वाहनेही पेटवून दिली.

सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र इथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राम मंदिरात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या मेसेज, फोटो किंवा व्हिडीओचं सत्य पडताळल्याशिवाय विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT