chhatrapati sambhajinagar rain update 16 mm rainfall in just 20 minutes weather forecast
chhatrapati sambhajinagar rain update 16 mm rainfall in just 20 minutes weather forecast sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhajinagar Rain : अवघ्या २० मिनिटांत पडला १६.३ मिलीमीटर पाऊस

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरात शनिवारी (ता. २०) सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दरम्यान, पावसापूर्वी सोसाट्याचा वारा सुटल्याने सगळीकडे धूळच धूळ दिसत होती. चालकांना आपली वाहने जागेवरच उभी करावी लागली. सायंकाळी सात ते साडेसातदरम्यान विजांच्या कडकडाटासह जोराचा पाऊस झाला. अवघ्या २० मिनिटांत १६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

शहरात दिवसभर प्रचंड उकाडा होता. ढगाळ वातावरण असल्याने ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. सायंकाळी पाचनंतर ढगांची गर्दी झाली. सायंकाळी सातच्या सुमारास २० मिनिटे पाऊस झाला.

सायंकाळी पाचच्या सुमारास वारा सुटला. पावणेसातला वाऱ्याने वेग पकडल्याने शहरात जिकडे-तिकडे धूळच धूळ दिसत होती. त्याचा त्रास वाहनधारकांना झाला. रस्त्यावरील कचरा, धूळ घरात घुसल्याने अनेकांची त्रेधातिरपीट उडाली.

वाऱ्याचा वेग २५ ते ३० नॉट्स

वेधशाळेच्या चिकलठाणा येथील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, १६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी वाऱ्याचा वेग प्रतितास २५ ते ३० नॉट्स होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT