crime esakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : प्लॉटिंगवरून वादात पोलिसांवर दगडफेक; उपनिरीक्षक, अंमलदार गंभीर जखमी

प्लॉटिंगवरून दोन गटांत सुरू असलेल्या वादाची माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेतलेल्या पोलिसांच्या ताफ्यावर दोन्ही गटातील जमावाने ‘आमच्या वादात पडू नका, अन्यथा पोलिसांनाही जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत तुफान दगडफेक केली.

सकाळ वृत्तसेवा

प्लॉटिंगवरून दोन गटांत सुरू असलेल्या वादाची माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेतलेल्या पोलिसांच्या ताफ्यावर दोन्ही गटातील जमावाने ‘आमच्या वादात पडू नका, अन्यथा पोलिसांनाही जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत तुफान दगडफेक केली.

छत्रपती संभाजीनगर - प्लॉटिंगवरून दोन गटांत सुरू असलेल्या वादाची माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेतलेल्या पोलिसांच्या ताफ्यावर दोन्ही गटातील जमावाने ‘आमच्या वादात पडू नका, अन्यथा पोलिसांनाही जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत तुफान दगडफेक केली. यामध्ये पोलिसांच्या ताफ्यातील एक पोलिस उपनिरीक्षक, एक अंमलदार गंभीर जखमी झाले. ही घटना ६ मार्च रोजी सकाळी ११ दरम्यान उस्मानपुरा भागातील महतोले गल्ली परिसरात घडली. याप्रकरणी दगडफेक करणाऱ्या दोन्ही गटातील तीस जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.

याप्रकरणी गंभीर जखमी झालेले पोलिस उपनिरीक्षक कौतिक सखाराम गोरे (वय ५७) यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीनुसार महतोले गल्ली भागात काही लोकांचे आपसांत भांडण सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यावरुन उपनिरीक्षक गोरे, उपनिरीक्षक केसरे, अंमलदार वाघचौरे, पोलिस नाईक सय्यद, नाईक फिरंगे हे घटनास्थळी गेले असता, त्यांना प्लॉटवरून शंभरावर जणांचे भांडण सुरु असल्याचे दिसले. वाद थांबविण्यासाठी पोलिसांनी धाव घेतली असता, दोन्ही गटांतील लोकांनी ओरडून ‘आमच्या भांडणात पोलिसांनी यायचे नाही, नाहीतर आम्ही पोलिसांनाही जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत दोन्ही गटांकडून पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत काही दगड उपनिरीक्षक गोरे यांच्या डोक्यावर, पाठीवर, हातावर लागले. एक दगडाचा फटका जोरात डोक्यात लागल्याने गोरे यांचे डोके फुटले. तसेच हवालदार वाघचौरे यांच्या छातीत लागल्याने दोघेही गंभीर जखमी झाले.

यांच्यावर गुन्हे दाखल

एका गटातील प्लॉटचा ताबा घेण्यासाठी आलेले आरोपी युनूस खान, एजाज खान, जाकीर शेख (टिपू), फेरोज, युनूसचा मुलगा लाला, खाजामीन, हाशिम पटेल, आकाश गायकवाड आणि इतर आरोपी तसेच दुसऱ्या गटातील आरोपी प्रेमचंद महतोले, विनोद महतोले, संतोष महतोले, खेमचंद महतोले, विक्रम महतोले, प्रवीण महतोले व इतर आरोपी अशा दोन्ही गटांतील तीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ, डोईफोडे करत आहेत.

काय आहे प्रकरण?

प्रकरणात परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. एका गटातील युनूस खान यांच्या तक्रारीनुसार सदर वादग्रस्त प्लॉट हा त्यांच्या मालकीचा असून मोकळ्या प्लॉटवर इतरांनी कचऱ्याचे ढिगारे ते साफसफाई करुन पत्र्यांचे शेड मारत असताना महतोले कुटुंबीयांनी त्यांना लाठ्या काठ्या, दगडांनी मारहाण केली. तर दुसऱ्या गटातील विनोद महतोले यांच्या फिर्यादीनुसार सदर प्लॉट हा त्यांचा वडिलोपार्जित असून माणिकचंद महतोले यांनी तो इतरांना विक्री केला. त्यावर खंडपीठात वाद सुरु आहे.

दरम्यान ६ मार्च रोजी माणिकचंद महतोले यांनी सदर प्लॉटवर शेड मारण्याचे सांगितल्यावरुनच इतरांनी सदर प्लॉटवर काम सुरु केले. त्यांना जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर आपणांस दगडांनी मारहाण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या दोन्ही गटासोबतच माणिकचंद यांनीही फिर्याद दिली आहे, त्यानुसार त्यांचा वडिलोपार्जित प्लॉट अहेमद शेरखान यांना कायमस्वरुपी विक्री केला आहे. मात्र तरीही प्रेमचंद महतोले यांच्यासह इतरांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. यातही आपल्या बाजूने निकाल लागूनही आपणांस विनोद महतोले यांच्यासह इतरांनी माणिकचंद यांच्या दुकानात घुसून त्यांना बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Development : पुण्याच्या प्रश्नांचा विधानसभेत आवाज, आमदारांकडून उपाययोजनांची मागणी; वाहतूक कोंडीसह अतिक्रमणे हटवावीत

Ashadhi Wari 2025: 'जो तरुण भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात'; आधुनिक वाद्यांसह भारुडकार कृष्णा महाराज यांची भारुडसेवा

Gadchiroli Education: गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी पोलिसांना शरण; बोगस शिक्षक पराग पुडकेचा प्रस्ताव केला होता मंजूर

ख्रिश्चन आक्रमक! आमदार पडळकरांचे ख्रिश्चन धर्माबद्दल अवमानकारक वक्तव्य; मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

Pune News : आपत्तींमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ; लष्करी अभियंत्यांच्या कामगिरीचेही कौतुक

SCROLL FOR NEXT