chhatrapati sambhaji nagar Esakal
छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये रंगणार पहिले शिक्षक साहित्य संमेलन, कवी डॉ. हबीब भंडारे संमेलनाचे अध्यक्ष

शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांच्यावतीने छत्रपती संभाजीनगर येथे येत्या १० फेब्रुवारी रोजी पहिले शिक्षक साहित्य संमेलन पार पडणार आहे

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांच्यावतीने छत्रपती संभाजीनगर येथे येत्या १० फेब्रुवारी रोजी पहिले शिक्षक साहित्य संमेलन पार पडणार आहे. कवी डॉ. हबीब भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन होणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी दिलीप सिरसाठ व रमेश ठाकूर यांनी दिली आहे.

शाळांमध्ये अनेक गुणी साहित्यिक, कवी, कलावंत शिक्षक आहेत. भाषा व कला विकासात आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व तसेच सर्वांगीण विकासात हे शिक्षक मोलाचे योगदान देत आहेत. या शिक्षकांच्या साहित्यप्रतिभेला आणि कलेला अधिकचा वाव मिळावा, लिहणाऱ्या हातांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हे शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. शिक्षण विभाग जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर आयोजित शिक्षकांनी शिक्षकांसाठी भव्य स्वरूपात भरवले जात असलेले हे जिल्ह्यातील पहिलेच शिक्षक साहित्य संमेलन आहे.

शनिवारी (१० फेब्रुवारी २०२४ रोजी) सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळात हे संमेलन अग्रसेन विद्यामंदिर, कांचनवाडी, येथे होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे उपस्थित राहणार आहेत.

या शिक्षक साहित्य संमेलनात कथाकथन, कविसंमेलन, परिसंवाद आणि चित्रप्रदर्शन यांचा समावेश असून ४०० हून अधिक शिक्षक यात सहभागी होणार आहेत. ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होणार असून त्यानंतर प्राचार्य रवींद्र तोरवणे यांच्या हस्ते ४० हून अधिक शिक्षक कलावंतांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन होईल. याच कार्यक्रमात १३८ हून अधिक शिक्षक कवींच्या कवितांचा समावेश असलेला 'काव्यदिंडी' हा संपादित कवितासंग्रह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित केला जाणार आहे.

दुसऱ्या सत्रात 'शिक्षक साहित्याचा विद्यार्थी अध्ययनावर प्रभाव' या विषयावर डॉ. संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून त्यात मेघना गोरे, अनिल देशमुख, संजय कुलकर्णी, शेख शब्बीर, डॉ. शिवानंद भानुसे, डॉ. विनोद सिनकर हे शिक्षक साहित्यिक सहभागी होणार आहेत. त्यानंतरच्या सत्रात नामदेव निकम यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन पार पडेल, यात दीपक सोनवणे, खान जिनत फरहीन वजाहत अली, रुपाली बंडाळे, वैशाली साबदे, अश्विनी सोनवणे, कुमार बिरदवडे, किरण गाडेकर हे शिक्षक कथाकार सहभागी होणार आहेत.

त्यानंतर भव्य कविसंमेलन ज्येष्ठ कवी प्रा. श्रीधर नांदेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून यात ५६ हून अधिक शिक्षक कवी सहभागी होणार आहेत. शेवटच्या सत्रात संमेलनाचा समारोप समारंभ प्रसिद्ध बालसाहित्यिक, अनुवादक डॉ. विशाल तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर मधुकर देशमुख, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yavatmal Crime: मुलानेच आईच्या मदतीने केला वडिलांचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह बंधाऱ्यात फेकला, यवतमाळ जिल्हा हादरला!

Latest Marathi News Live Update : लोणावळ्यात वाहतूक कोंडी! 5 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Rahul Gandhi : घाबरल्यामुळेच मोदींची संसदेकडे पाठ; जबाबदारीपासून पळ काढल्याचाही आरोप

Gadchiroli News: मार्कंडेश्वराचा जीर्णोद्धार दहा वर्षांपासून सुरूच; महाशिवरात्री यात्रा दोन आठवड्यांवर, अपूर्ण कामांबाबत भाविकांमध्ये नाराजी!

Kolhapur Heritage : ५० वर्षांचे वृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर; ‘हेरिटेज ट्री’ फक्त कागदावरच!

SCROLL FOR NEXT