Chhaya Sabade reached abroad hard work  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यामधल्या शेवयांची चव पोचली अमेरिका जर्मनीला !

चॉकलेट, पेरू, सीताफळ, पालक, पुदिन्यासह १५ प्रकारच्या फ्लेवरच्या शेवयांचा ब्रॅण्ड

शेखलाल शेख ः सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : चॉकलेट फ्लेवरच्या शेवया...पालक-पुदिना फ्लेवरच्या शेवया...! ऐकायला अन् वाचायलाही जरासे वेगळे वाटते ना! मूळच्या छत्रपती संभाजीनगरातील महिलेने शेवयांचा हा अनोखा ब्रॅंड विकसित केलाय. वाट कितीही बिकट असली तरी जिद्द, मेहनत आणि चिकाटीने प्रयत्न केल्यास यश मिळते.

असेच यश छाया जगदीश साबदे यांनी मिळविले आहे. त्यांनी आपल्या मेहनतीतून फळ, भाज्यांच्या फ्लेवर असलेल्या तब्बल १५ प्रकारच्या शेवया, तृणधान्यांपासून लाडू, शेव, चटपटे मसाले, गव्हाच्या पिठापासून प्रोटीन पॉवडर, नाचणीपासून गुलाब जामूनचे ‘सिद्धी फुड्स’चे ब्रॅण्ड विकसित केले आहे. त्यांनी तयार केलेल्या शेवयांना राज्यासह, अमेरिका, जर्मनीतील नागरिकांकडूनही मागणी येत आहे.

छाया साबदे या मूळच्या छत्रपती संभाजीनगर शहरातील आहेत. त्यांचे बीएपर्यंतचे शिक्षण झाले आहे. शिक्षण सुरू असतानाच त्यांचा २००५मध्ये विवाह झाला. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी एका खासगी कंपनीत वर्षभर नोकरी केली. शिक्षिका म्हणून काम पाहिले.

सात-आठ महिने पोळी-भाजी केंद्र चालवले. त्यानंतर ज्वेलरी, रूखवत साहित्य आणून त्याचे वेगवेगळे डिझाइन तयार करून ते विकण्याचे काम केले. मात्र यात मन रमले नाही. त्यामुळे काय करावे यासाठी त्यांनी काही महिलांशी चर्चा केली.

त्यानंतर त्यांनी मिरची पावडर, मसाले तयार करण्यासाठी ग्राइंडिंग मशीन घेतले. दोन वर्षांनंतर त्यांना ग्राहकांची नेमकी गरज काय, याचा अंदाज आला. या अंदाजातून त्यांनी मिरची, मसाला उद्योगाला शेवयांच्या व्यवसायाची जोड दिली.

तृणधान्याचे लाडू, शेव

शेवयांसोबत छाया साबदे या ज्वारी, बाजारी, नाचणीपासून लाडू, शेव तयार करीत आहेत. तसेच चटपटे मसाले सुद्धा प्रसिद्ध आहे. शेवया तयार करत असताना त्यांनी गव्हाच्या पिठापासून प्रोटीन पॉवडर तयार केली आहे. त्यांनी नाचणीपासून गुलाब जामून तयार करण्याचा प्रयोग केला होता, हा प्रयोगसुद्धा यशस्वी झाला आहे.

त्यांना यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. किशोर झाडे यांचे मार्गदर्शन तर महिला आर्थिक विकास महामंडळ संचलित रमाई लोकसंचलित साधन केंद्र, शेंद्रा यांच्याकडून मार्केटिंगसाठी साहाय्य मिळत आहे

फ्लेवर्ड शेवयांचा ब्रॅण्ड

कृषी विज्ञान केंद्रात छाया साबदे यांनी प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणामुळे त्यांना फळप्रक्रिया, सोया प्रक्रिया व भाजीपाला प्रक्रियेचे तंत्र अवगत झाले. यातून त्यांनी स्वत:चे कौशल्य वापरून सोजीपासून साध्या शेवयासह विविध फळे व भाजीपाल्याच्या जवळपास १५ फ्लेवरच्या शेवया बाजारात आणल्या. यात बीट, टोमॅटो, पालक, पुदिना, आंबा, चॉकलेट, जांभूळ, सीताफळ व पेरू, दुधाचा फ्लेवर शेवयात आणला आहे.

सोयाबीनवर प्रक्रिया करून २० प्रकारचे पदार्थ त्या तयार करू शकतात. यासाठी लागणारा भाजीपाला, फळे त्या थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करत आहेत. तसेच या शेवया तयार करण्यासाठी दोन महिला पूर्णवेळ काम करतात. त्यांनी शेवया तयार करण्यासाठी अत्याधुनिक मशिनरी घेतल्या आहेत. त्यांनी तयार केलेल्या शेवया आता महाराष्ट्रासह, अमेरिका, जर्मनीत वास्तव्यास असलेले भारतीय खरेदी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT