crime sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh.sambhaji Nagar Police : सिनेस्टाइल पाठलाग करत बंदूकधारी आरोपी जेरबंद

भरपावसात पोलिस तीन तास मागावर.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - लहान भावाने पत्नीचा विनयभंग केल्याने पिस्तूल घेऊन त्याच्या शोधासाठी मोठा भाऊ निघाला. याची भणक पोलिसांना लागली अन् तेही पिस्तूलधारी मोठ्या भावाच्या मागावर लागले. बंदूकधारी संशयिताने तब्बल तीन तास भरपावसात पोलिसांना चकवा दिला.

परंतू तीन तासानंतर पाठलाग करून अखेर पोलिसांनी त्याला पिस्टल, जिवंत काडतूस, बुलेटसह पकडलेच. हा थरार २३ सप्टेंबरच्या रात्री घडला. गुड्डू ऊर्फ मॅक्स ऊर्फ शेख जुबेर शेख मकसूद (३७, रा. विजयनगर, गारखेडा) असे त्याचे नाव आहे.

पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी ‘सकाळ’ला माहिती दिली, की टिप्या ऊर्फ शेख जावेद मकसूद हा रेकॉर्डवरील कुख्यात आरोपी आहे. त्याने मोठा भाऊ गुड्डू याला ‘माझ्या नावावर गांजा, चरस विक्रीचा धंदा कर’ असे सांगितले.

त्यावेळी नकार देणाऱ्या गुड्डूला धमकी देत निघून जाताना गुड्डूच्या पत्नीचा विनयभंग केला. त्यामुळे रागाच्या भरात २३ सप्टेंबरसा सायंकाळी ७.३० दरम्यान भर पावसात गुड्डू हा टिप्याचेच पिस्टल घेऊन टिप्याच्या मागावर निघाला. काही हॉटेल्समध्ये त्याने टिप्याची चौकशी केली.

दरम्यान, याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना मिळाली. अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसही गुड्डूच्या मागावर निघाले होते. ही कारवाई निरीक्षक श्रीमती आडे यांच्यासह सहायक निरीक्षक शेषराव खटाणे, उपनिरीक्षक आनंद बनसोडे, उपनिरीक्षक संदीप काळे, सहायक फौजदार व्ही. व्ही. मुंढे, जालिंदर मांटे, गणेश डोईफोडे, दीपक देशमुख, कल्याण निकम, संदीप बीडकर, प्रशांत नरवडे यांनी केली.गुड्डूचा मुक्काम हर्सूल जेलमध्ये आरोपी गुड्डू याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

गुड्डूवर आठ गुन्हे दाखल

लहान भाऊ टिप्याच्या शोधार्थ पुंडलिकनगरातून गुड्डू कॅनॉटमध्ये आला. तेथून पोलिसांना चकवा देत तो टीव्ही सेंटर भागात गेला. सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराचा विषय होऊ नये, म्हणून पुंडलिकनगर पोलिसांनी सावधानतेचा पवित्रा घेत त्याचा पाठलाग सुरूच ठेवला होता. नेमकी याची भणक आरोपी गुड्डूला लागली. त्याने पोलिसांना हुलकावणी देत टीव्ही सेंटर भागातून चोरट्या मार्गाने घर गाठले. अखेर पोलिसांनी रात्री १०.३० वाजता घरात त्याच्यावर झडप मारून बेड्या ठोकल्या. गुड्डू हा देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरोधात यापूर्वी मुकूंदवाडी, पुंडलिकनगर ठाण्यात आठ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT