Devagiri Vidyalaya Daulatabad  esakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar : शाळेत बाकड्यावर बसण्यावरून वाद; चार वर्गमित्रांच्या मारहाणीत कार्तिकचा दुर्दैवी अंत

बाकड्यावर बसण्यावरून झालेल्या वादात शाळेच्या मैदानावर चार वर्गमित्रांनी केलेल्या मारहाणीत एका अकरा वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

सकाळ डिजिटल टीम

मधल्या सुट्टीत कार्तिक शाळेच्या मैदानावर खेळताना त्याच्या दुसरा वर्गातील 4 विद्यार्थ्यांनी कार्तिकला मारहाण केली.

छत्रपती संभाजीनगर : छ. संभाजीनगरात (Chhatrapati Sambhajinagar) एक दुर्दैवी घटना घडलीये. वर्गात बाकड्यावर बसण्यावरून झालेल्या वादात शाळेच्या मैदानावर चार वर्गमित्रांनी केलेल्या मारहाणीत एका अकरा वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर जवळ असलेल्या दौलताबाद (Daulatabad) इथं हा प्रकार घडलाय. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात चार अल्पवयीन मुलांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय. कार्तिक गायकवाड असं मृत विद्यार्थ्यांचं नाव आहे.

दौलताबादच्या देवगिरी विद्यालयात सातवीच्या वर्गात कार्तिक हा त्याच्या बहिणी सोबत शिक्षण घेत होता. दरम्यान, 6 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता शाळेतील वर्गखोलीत बाकड्यावर बसण्यावरुन त्याचा एका वर्गमित्राशी वाद झाला.

त्यानंतर मधल्या सुट्टीत कार्तिक शाळेच्या मैदानावर खेळताना त्याच्या दुसरा वर्गातील 4 विद्यार्थ्यांनी कार्तिकला मारहाण केली. मारहाण केल्यावर हे चारही जण तिथून पळून गेले. मारहाणीनंतर कार्तिकच्या पोटात दुखत होते.

11 जुलैला त्याला अधिक त्रास होत असल्याने त्याच्या वडिलांनी त्याला एका खासगी रुग्णालयात नेलं. मात्र, पोटदुखीचा त्रास काही कमी होत नव्हता. त्यानंतर कार्तिकला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान कार्तिकचं 14 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास निधन झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT