छत्रपती संभाजीनगर

सिटिझन जर्नालिस्ट सिटिझन जर्नालिस्ट सिटिझन जर्नालिस्ट

CD
((सिटिजन जर्नालिस्ट)) -- ABD26J81071 गळतीमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी सिडको वाळूज महानगर (१) : या परिसरात आठवड्यातून अवघा एकदाच पाणीपुरवठा होतो. असे असतानाही सिडको महानगर-१ मधील पाइपलाइन रोडवर अनेक ठिकाणी रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर पाणीगळती सुरू असते. एकीकडे नागरिक तहानलेले आहेत आणि दुसरीकडे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. सिडको प्रशासनाने या पाणीगळतीची त्वरित दखल घेऊन ती बंद करावी, तसेच पाण्याचे योग्य नियोजन करून नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करावा. - हनुमंत प्रल्हादराव खोसे -- कचरा जाळल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सिडको वाळूज महानगर (१) : शहरातील विविध परिसरांमध्ये, दुकानांसमोर आणि घरांच्या आजूबाजूला प्लॅस्टिक कचरा मोठ्या प्रमाणावर साचत आहे. हा कचरा न उचलता तो सरसकट पेटवून दिला जातो. विशेष म्हणजे यंत्रणेचे कर्मचारीही कचरा जाळताना दिसतात. यामुळे सकाळी परिसरात प्रचंड धूर पसरून हवेचे प्रदूषण वाढले आहे. सकाळच्या वेळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना तोंडाला स्कार्फ बांधूनच बाहेर पडावे लागत असून, यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी कचरा उघड्यावर न जाळता तो कचरापेटीतच टाकावा. आपली ही छोटीशी खबरदारी अनेकांचे आरोग्य आणि प्राण वाचवू शकते. - सुप्रिया विनोद गांधी --- लोंबकळणाऱ्या इंटरनेट केबलमुळे अपघाताची भीती सिडको (एन-२) : विद्यार्थी, व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी इंटरनेट अत्यंत आवश्यक झाले आहे. इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या अनेक कंपन्यांमुळे शहरात केबलचे अक्षरशः जाळे पसरले आहे. सेवा खंडित (डिस्कनेक्ट) झाल्यानंतरही अनेक कंपन्या जुन्या केबल तशाच सोडून देतात. या टाकाऊ केबल सध्या घरांवर, रस्त्यांवर इतरत्र पडून आहेत, तर काही केबल खाली रस्त्यावर धोकादायकपणे लोंबकळत आहेत. यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित प्रशासनाने व कंपन्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन लोंबकळणाऱ्या केबल्स हटवाव्यात. - सुरेश खांदवे ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT