जात वैधता प्रमाणपत्र Sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : जात वैधता मुदत वाढीचे निघणार परिपत्रक

अब्दुल सत्तार यांच्या सूचना : मागासवर्गीय उमेदवारांना मिळणार दिलासा?

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद : राज्यात होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी मागासवर्गीय उमेदवारांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे. यात जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत एक वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी, असे परिपत्रक ग्रामविकास विभागाच्या वतीने सोमवारी (ता.६) जारी करण्यात येणार आहे. यासंदर्भात महसूल, ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामविकास विभागाला एक परिपत्रक जारी करण्याची सूचना केली आहे.

‘निवडणूक लढवायची? आदी जात वैधता द्या’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने वृत्त छापले होते. या बातमीचा आधार घेत जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती सभापती गलांडे यांनी ग्रामविकास मंत्री सत्तार यांना जात वैधतेसंदर्भात विचारणा केली. यावर मंत्री सत्तार यांनी ग्रामविकास सचिव व अधिकाऱ्यांची बैठक बोलावून जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत एका वर्षाची मुदत वाढीचे परिपत्रक तयार करण्यास सांगितले.

दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने १७ नोव्हेंबरला काढलेल्या परिपत्रकानुसार, सन २०२०चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४, दिनांक ११ मार्च २०२० अन्वये जात वैधताप्रमाणपत्र सादर करण्याचे हमी देण्याचा मुभा कालावधी संपुष्टात आल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम सन १९५९ चा अधिनियम क्र.३ च्या कलम १०-अ मधील तरतुदीनुसार नामनिर्देशनपत्रासोबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

या अटीमुळे राज्यातील ग्रामपंचायती निवडणूक लढायची कशी, असा प्रश्न अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांपुढे निर्माण झाला होता. यापूर्वी प्रत्येक निवडणुकीत निवडणुका झाल्यानंतर विजयी उमेदवाराला जात पडताळणी करावी लागायची. आता मात्र निवडणुकीअगोदरच जात पडताळणी मागत असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांची गोची झाल्याचे पाहावयास मिळत आहे. परंतु या परिपत्रकामुळे राज्यातील मागासवर्गीय उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: शिपायाचा पगार जाणार लाखाच्या घरात! आठव्या वेतन आयोगाकडे फिटमेंट फॅक्टरचा प्रस्ताव

Viral Video : ‘’मी सहन करू शकलो नाही.., मी राजीनामा दिलाय... ’’, सांगत चक्क जीएसटी उपायुक्त पत्नीशी बोलताना ढसाढसा रडले!

Latest Marathi News Live Update : गायिका अंजली भारतीच्या वादग्रस्त वक्तव्याची राज्य महिला आयोगाने घेतली दखल

Video: कचऱ्यात पडलेल्या देवाच्या मूर्ती मुस्लिम व्यक्तीने उचलल्या; स्वच्छ करुन केलं विसर्जन, व्हिडीओ व्हायरल

Viral Video: प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ पाहून अमित शहांच्या पत्नीने काय केलं असंकाही की, तुम्हीही कौतुक कराल

SCROLL FOR NEXT