city bus city bus
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद आजपासून शहरात धावणार शहर बस

तब्बल ७७ दिवसांची प्रतीक्षा संपली ; स्टिरिंग येणार आता माजी सैनिकांच्या हाती

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद असलेली शहर बस सेवा तब्बल ७७ दिवसानंतर रविवारपासून (ता.२४) सुरू होणार आहे. स्मार्ट शहर बसचा रविवारी तिसऱ्या वर्धापनदिन असून, बसचे स्टिअरिंग आता माजी सैनिकांच्या हाती राहणार आहे. पहिल्या टप्प्यात ११ बस दोन टप्प्यात सुरू केल्या जाणार आहेत.

शहर बससेवेसाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन व एसटी महामंडळ यांच्या करार झाला होता. शहर बससाठी लागणारे चालक-वाहक महामंडळामार्फत पुरविले जात होते. पण एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर असून, ७७ दिवसांपासून शहर बस सेवाही बंद आहे. दरम्यान महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी एसटी महामंडळापासून शहर बससेवा वेगळी केली जाईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी शहर बससाठी करार पद्धतीने माजी सैनिकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना चालक म्हणून १५ वर्षाचा अनुभव आहे, त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे रविवारपासून ११ बसेस रस्त्यावर धावतील. शहर बस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवणीकर, उप व्यवस्थापक मुकुल देव व सिध्दार्थ बनसोड यांच्या देखरेखीखाली ५६ चालक व वाहकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे.

या मार्गावर पाच धावणार बस

मार्ग क्रमांक- ४

सिडको ते रेल्वे स्टेशन मार्गे-टीव्ही सेंटर

मार्ग क्रमांक-५

औरंगपुरा ते रांजणगाव मार्गे-मध्यवर्ती बस स्थानक

मार्ग क्रमांक- १२

सिडको ते घाणेगाव मार्गे-रांजणगाव.

मार्ग क्रमांक-१३

सिडको ते जोगेश्वरी मार्गे-रांजणगाव

मार्ग क्रमांक- १९

चिकलठाणा ते रांजणगाव मार्गे-सिडको, महावीर चौक, मोरे चौक

कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक

शहर बसमधून प्रवास करताना प्रवाशांना कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करावे लागणार आहे. प्रवासाच्या वेळी मास्क, सॅनिटायझर वापरणे, कोविड प्रतिबंधक दोन लस घेऊनच प्रवास करणे व शासकीय आरोग्य विषयक सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे स्मार्ट शहर बस विभागाकडून कळविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ७५०७९५३८२८ व्हाट्सॲप क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

Marathi News Live Updates : डीजे बंदीच्या मागणीला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, बापटांबाबत काय म्हणाले?

Uddhav Thackeray: DJ बंदीच्या मागणीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकार विद्यानंद बापट यांच्यासोबत...

SCROLL FOR NEXT