छत्रपती संभाजीनगर

सुरेल मैफिलीला प्रतिसाद

CD
शास्त्रीय बंदिशींच्या सुरेल मैफिलीने रसिक मंत्रमुग्ध ---- गुरू पद्मभूषण पं.सी.आर. व्यास संगीत महाविद्यालयातर्फे आयोजन ---- धाराशिव, ता. २७ (बातमीदार) : गुरू पद्मभूषण पं.सी.आर. व्यास संगीत महाविद्यालयाच्या वतीने आयोजित शास्त्रीय बंदिशींच्या सुरेल मैफलीत विविध रागांतील बंदिशींची शास्त्रोक्त मांडणी करण्यात आली. गायकांच्या सुरेल सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत मैफलीचा आनंद घेतला. कार्यक्रमाची सुरवात शिवन्या मुसळे हिच्या राग दुर्गाच्या गायनाने झाली. तिने ‘मनमोहन मुरलीवाला’ ही बंदिश त्रितालात सादर केली. तिला तबल्यावर सुरेश वाघमारे, तर हार्मोनिअमवर मेधांश व्यास यांनी साथ केली. वेदिका मुळे हिने राग भूपाली सादर करत मध्यलय झपतालातील गुरू पं.सी.आर. व्यास यांची ‘बलमा तोरी याद सतावे’ ही बंदिश गायली. ‘दे दे मोहें मुदरिया मोरी’ ही बंदिशही तिने अद्धा त्रितालात सादर केली. मेधांश व्यास याने राग यमनमधील सुरेल आलापी आणि नेमका रागविस्तार सादर केला. ‘चरण तोरे बिनती मोरी’ ही विलंबित झपतालातील, तर ‘आयी रे मिलन तोहे’ ही एकतालातील बंदिश त्याने गायली. त्याला हार्मोनिअमवर वेदिका मुळे हिने साथ केली. अविनाश यादव यांनी राग भीमपलास, तर पं. वेदांग धाराशिवे यांनी राग झिंझोटी सादर केला. त्यानंतर राग जोगमधील ‘साजन मोरे घर आये’ या बंदिशीने मैफिलीची रंगत वाढवली. कार्यक्रमाची सांगता पं. शिवरुद्र स्वामी यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग बिहागमधील ‘कैसे सुख सोवे निंदरिया’ हा विलंबित ख्याल एकतालात सादर केला. राग नारायणीतील बंदिशीनंतर भैरवीतील बाबूल मोरा नैहर छूटो ही जाये’ ही ठुमरी गाऊन त्यांनी रसिकांनाही गायनात सहभागी करून घेतले. मुखबंद तान, मिंड आणि दमदार आवाजामुळे त्यांचे सादरीकरण संस्मरणीय ठरले. त्यांना हार्मोनिअमवर पं. दीपक लिंगे, तबल्यावर चैतन्य पांचाळ, तर तानपुरावर अमृत जावळे, संतोष देशमुख, जयकुमार नायगावकर आणि राम गोरे यांनी साथ दिली. धनंजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शुद्धमती सावता फुलसागर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या डिजिटल मीडिया प्रमुखांचा आढळला मृतदेह; चालत्या ट्रेनमधून झाले होते बेपत्ता

Water Crisis : हक्काचे पाणी उपसले; गावाला शासकीय टँकरची प्रतीक्षा! करजगावच्या पाझर तलावाने गाठला तळ

Latest Marathi News Live Update : पहिल्या फेरीत सेनेच्या किरण सरनाईक यांची आघाडी; काँग्रेसच्या अदिती पोहरे चौथ्या स्थानावर

Pakistan vs Sri Lanka: पाकिस्तानची घरच्या मैदानावर दाणादाण! श्रीलंकेने ११० धावांत गुंडाळलं, मदुशंकाचा पंजा अन् थेट फायनलमध्ये धडक

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण, ११ गोविंदांसह कॅमेरामनला जामीन; प्रमुख आरोपींच्या अर्जांवर सुनावणी बाकी

SCROLL FOR NEXT