schools  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद:शाळा बंद ठेवणे म्हणजे दडपशाही

शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: राज्य शासनाने सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. पंरतू, मनपा प्रशासनाने(Municipal administration) आठ दिवसांचा आढावा घेवून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेवू असा खोडा घातल्याने संस्थाचालक, शिक्षक, पालकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad)यांनी सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यापार्श्‍वभूमीवर विचारणा केली असता, श्री. पांडेय म्हणाले, की शहरात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आठ दिवसानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाई

यावर मुख्याध्यापक संघटनेचे प्रकाश सोनवणे म्हणाले की, शहरातील मॉल, बाजार, सिनेमा हॉल, बार, मॉल, हॉटेल सुरु ठेवण्यासाठी परिस्थितीचा आढावा का घेतला नाही? आताच नगरपरीषद, जिल्हा परीषद निवडणुका झाल्या, त्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली तेंव्हा कुठे गेला होता कोरोना? मात्र, शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली की, कोरोनाचे नाव पुढे केले जाते. मुख्याध्यापिका कल्याणी सांगोले म्हणाल्या की, मुलांच्या शिक्षणाची ही गळचेपी आहे. सर्वच बंद ठेवा, नाहीतर सगळी आस्थापने सुरु ठेवा. केवळ शाळा बंद ठेवून मुलांची भावी पीढी बरबाद करण्याचा मनपा प्रशासनाला अधिकार नाही.

राज्य शासनानकडून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनपा प्रशासनाने कधीच शाळा लवकर सुरु व्हाव्यात यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला नाही. मनपा प्रशासनाने सुरु असलेल्या आस्थापना बंद करुन केवळ शाळा सुरु ठेवाव्यात, मग कोरोना रुग्ण संख्येत वाढ होते का ते पहावे. केवळ शाळा, महाविद्यालयासाठीचा निर्णय राखून ठेवणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा आणल्यासारखे आहे, असे पालक युसूप पटेल यांनी सांगितले.शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांची मागणी ‘सकाळ’ ने उचलून धरली. राज्य शासनाने याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याबद्दल सकाळ आणि शासनाचे धन्यवाद. आता स्थानिक प्रशासनासही राज्यशासनाने शाळा सुरू करण्याचे आदेश द्यावेत. स्थानिक परिस्थिती बघून किती दिवस निर्णय लांबविणार याची मर्यादा शासनाने ठरवून द्यायला हवी.

-डॉ. रूपेश मोरे, शिक्षणतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT