मनसे अध्यक्ष राज ठाकरे  sakal
छत्रपती संभाजीनगर

मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यातील दोन कोटी जनतेची दिशाभूल - मनसे

मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : वीस वर्षापासून औरंगाबादकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू न शकलेल्या शिवसेनेने सातत्याने आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी आजी माजी भावी साथीदारांची भाषा करून मूळ विषयाला बगल देत मराठवाड्यातील दोन कोटी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात केला आहे.

दाशरथे म्हणाले, की मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. उद्योगनगरी म्हणवून घेत असलो तरी नवे उद्योगधंदे नाहीत. महिला सुरक्षेच्या प्रश्नांचे उत्तर शिवसेनेकडे नाहीत. स्थानिक सत्ताधारी यांना थोडीही लाज वाटत असेल तर, त्यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला द्यावीत.

पाणी प्रश्नापाठोपाठ लगेचच मनसेतर्फे शहराचा विकास आराखडा तसेच गुंठेवारीमध्ये जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक या गोष्टी मनसे जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दाशरथे यांनी दिला आहे.राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, उपशहराध्यक्ष गजन गौडा पाटील, आशिष सुरडकर, अब्दुल रशीद, विभाग अध्यक्ष अशोक पवार, विशाल विराळे, संदीप कुलकर्णी यांनी हा इशारा दिला .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

केकेआरचे १८ कोटी पाण्यात? दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर, चाहत्यांची वाढली धडधड, नेमकं काय घडलं ?

आज संपतोय Amazon Summer Sale, फक्त 99 रुपयांपासून मिळतायत वस्तू..सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

"आम्ही एकत्र सिनेमा बघायला जाणार होतो त्यापूर्वीच" राजा शिवाजी फेम अभिनेत्रीला पितृशोक; म्हणाली..

SCROLL FOR NEXT