sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : सर्दी, खोकला साथ साथ ; एकाच रुग्णालयात दिवसाकाठी तब्बल ५० ते ६० रुग्ण

गेल्या काही दिवसांत शहरातील तापमानात घट होत आहे. वातावरणातील या बदलामुळे शहरात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एका रुग्णालयात एकाच दिवसात ५० ते ६० रुग्णांची नोंद होत असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

छ्त्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांत शहरातील तापमानात घट होत आहे. वातावरणातील या बदलामुळे शहरात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एका रुग्णालयात एकाच दिवसात ५० ते ६० रुग्णांची नोंद होत असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमानात घट होत आहे. दोन दिवसांपूर्वी तर पारा १०.४ अंशापर्यंत खाली आला होता. त्यात रात्रीच्या वेळेला थंड हवा सुटत आहे. वातावरणातील या बदलामुळे गेल्या काही दिवसांत सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, कोरडा खोकला या आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील महापालिकेचे आरोग्य केंद्र असो की, गल्लीत असलेले छोटे- मोठे दवाखाने अशा सर्वच ठिकाणी रुग्णांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळते. यात अनेक रुग्णांना तर मागील दहा दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून सर्दी, खोकला असल्याचे समोर येत आहे.

अतिसार, उलटीचाही त्रास

थंडी ताप, सर्दी, डोकेदुखी यासोबतच अतिसार मळमळ, उलटीचा त्रास असणारे रुग्ण देखील दाखल होत आहेत. या रुग्णांची संख्याही लक्षणीय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वातावरणातील बदलामुळे सध्या सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखीच्या रुग्णांत वाढ झाली आहे. दररोज किमान ५० ते ६० रुग्ण आमच्याकडे येत आहेत. यासह अतिसार, उलटी अशी लक्षणे असणारे रुग्णही आहेत. रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गोळ्या-औषधी घ्यावीत.

- डॉ. किशोर जैन, जनरल फिजिशियन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20I World Cup 2026 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर! भारतातील 'या' शहरांमध्ये रंगणार सामने; पाकिस्तानविरुद्ध मॅच कधी?

Pune News : विद्यानगरमध्ये जिलेटिनच्या १३८ कांड्या आणि १३५ वायर सापडून खळबळ; पोलिसांची तत्पर धाव!

T20I World Cup 2026 साठी रोहित शर्माकडे मोठी जबाबदारी; ICC अध्यक्ष जय शाह यांच्याकडून घोषणा

Nazar Dosh Remedy: इडा पिडा टळो! नवविवाहीतांना लागू शकते नजर; नकारात्मक ऊर्जेपासून वाचण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

इल्लैयाराजा यांनी संगीतबद्ध केलेलं गोंधळ सिनेमाचं प्रोमोशनल मल्हारी गाणं प्रदर्शित ; सोशल मीडियावर चर्चा

SCROLL FOR NEXT