Sambhaji Nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : जिल्हाधिकारी दिलीप स्‍वामी यांनी स्वीकारला पदभार ; प्रशासन पारदर्शक, गतिमान करण्यास प्राधान्य

दिलीप स्वामी यांनी गुरुवारी (ता.१५) सकाळी जिल्हाधिकारी पदाचा पदभार महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडून स्वीकारला. जिल्ह्याचे प्रशासन गतिमान, पारदर्शक आणि संवेदनशील करण्यास आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : दिलीप स्वामी यांनी गुरुवारी (ता.१५) सकाळी जिल्हाधिकारी पदाचा पदभार महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडून स्वीकारला. जिल्ह्याचे प्रशासन गतिमान, पारदर्शक आणि संवेदनशील करण्यास आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

जी. श्रीकांत यांनी श्री. स्वामी यांचे स्वागत केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटन विकासासाठी अधिक काम करणे, निवडणूक प्रक्रिया राबविणे, जिल्ह्यातील टंचाईविषयक उपाययोजना करणे या विषयांना प्राधान्य असेल. त्याचबरोबर जिल्ह्याचे प्रशासन हे गतिमान, पारदर्शक करणे हे उद्दिष्ट असेल. प्रशासनाबद्दल जनतेच्या मनात कोणतेही किंतु परंतु राहू नये यासाठी प्राधान्य राहील’’, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा..

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT