छत्रपती संभाजीनगर

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘पोलिस आपल्या गावात’

CD
LTR03HTP03.jpg लातूर ः पोलिस आपल्या गावात या उपक्रमाअंतर्गत शेतकरी व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना पोलिस अधिकारी. ------------ दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘पोलिस आपल्या गावात’ - दोन दिवसांत २० गावांना भेटी; शेतकऱ्यांशी साधला संवाद -- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. ३ ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या सामाजिक व इतर विविध समस्यांना सामोरे जाण्यासाठी पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ता. १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ‘पोलिस आपल्या गावामध्ये’ हा विशेष कम्युनिटी पोलिसिंग उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसात वीस गावांना भेटी देत पोलिसांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या उपक्रमाच्या माध्यमातून पोलिस अधिकारी व कर्मचारी थेट गावांमध्ये जाऊन शेतकरी, नागरिक, महिला, युवक तसेच ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. दुष्काळामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या विविध सामाजिक समस्या, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच भविष्यातील संभाव्य अडचणींबाबत नागरिकांशी चर्चा करून आवश्यक मार्गदर्शन करण्यात येत आहे. उपक्रमाच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण २० गावांना भेटी देण्यात आल्या आहेत. यावेळी संबंधित गावातील शेतकरी व नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. किनगाव पोलिस ठाणे हद्दीतील कोळवाडी, मोळवण, हिंगणगाव, गोडाळा, सारोळा व खलंगरी या गावांना भेटी देण्यात आल्या. अहमदपूर पोलिस ठाणे हद्दीतील शिरूर ताजबंद व थोरलेवाडी, देवणी पोलिस ठाणे हद्दीतील विळेगाव, कासार शिरशी पोलिस ठाणे हद्दीतील कोराळी, रायलिंग व मुदगड, वाढवणा पोलिस ठाणे हद्दीतील वाढवणा बुद्रुक, चाकूर पोलिस ठाणे हद्दीतील चापोली व हुडगेवाडी, शिरूर अनंतपाळ पोलिस ठाणे हद्दीतील शिरूर अनंतपाळ व येरोळ, निलंगा पोलिस ठाणे हद्दीतील जाऊ व सावंगीरा, भादा पोलिस ठाणे हद्दीतील काळमाथा तसेच मुरुड पोलिस ठाणे हद्दीतील भोसा या गावांना भेट देण्यात आली. ---------- उपक्रमाच्या केंद्रस्थानी शेतकरी यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या नैसर्गिक व सामाजिक समस्यांना सामोरे जाण्यासाठी हा उपक्रम शेतकरी व नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात येत आहे. संभाव्य समस्या निर्माण होण्यापूर्वीच त्याबाबत आवश्यक पूर्वकाळजी घेणे, गावपातळीवर उपलब्ध असलेल्या यंत्रणांमध्ये समन्वय वाढविणे आणि सामूहिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : गिल-विराट स्वस्तात बाद, पण रोहित शर्माने केला वर्ल्ड रेकॉर्ड; सचिन तेंडुलकरला टाकले मागे

Abhishek Sharma: अभिषेक शर्माने पाकिस्तानची धुलाई केली, अन् एक-दोन नव्हे तर ६ विक्रम रचले! युवराज-कोहलीच्या खास क्लबमध्ये थेट एन्ट्री

Sugar Mill Opening : साखर कारखाने सुरु करण्यासंदर्भातील राजु शेट्टींची मागणीची मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडुन पाठराखण

लेट पण थेट! 'या' मुलांकाला जन्मलेल्या लोकांचे उशिरा होतात लग्न, लाईफ पार्टनर असा मिळतो की...

Latest Marathi News Live Update : नितेश राणेंविरोधात लुकआऊट नोटीस काढल्याचा अखिल चित्रेंचा आरोप

SCROLL FOR NEXT