छत्रपती संभाजीनगर

देवगिरी महाविद्यालयात कंपनी सेक्रेटरी करिअर जागरूकता कार्यक्रम

CD
देवगिरी महाविद्यालयात कंपनी सेक्रेटरी करिअर जागरूकता कार्यक्रम उस्मानपुरा, ता. १६ ः देवगिरी महाविद्यालयाच्या वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विभागातर्फे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या (आयसीएसआय) छत्रपती संभाजीनगर चॅप्टरच्या सहयोगाने कंपनी सेक्रेटरी-करिअर जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला. रवींद्रनाथ टागोर सभागृहात झालेल्या कार्यक्रमास १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून सीएस आदित्य जयकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. रवी पाटील होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. गणेश मोहिते, विभागप्रमुख राजेश लहाने यांच्यासह विभागातील प्राध्यापक उपस्थित होते. राजेश लहाने यांनी प्रास्ताविक केले. शिवम भराट यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सीएस आदित्य जयकर यांनी कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाची रचना, परीक्षा पद्धती तसेच अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संवादसत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रश्न विचारले. प्राचार्य प्रा. रवी पाटील यांनी कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक क्षेत्रात भक्कम करिअर घडविण्याची संधी मिळते, असे सांगितले. उपप्राचार्य डॉ. गणेश मोहिते यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमातील यशासाठी सातत्यपूर्ण अभ्यास व कठोर परिश्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. शिवम भराट यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT